असुसचे विवोबुक एक्स५०७ लॅपटॉप

By शेखर पाटील | Published: May 4, 2018 01:42 PM2018-05-04T13:42:53+5:302018-05-04T13:42:53+5:30

असुस कंपनीने पेटीएम मॉलसोबत सहकार्याचा करार केला असून याच्या अंतर्गत विवोबुक एक्स५०७ हे लॅपटॉप ग्राहकांना सादर केले आहे.

Asus' VivoBus X507 Laptop | असुसचे विवोबुक एक्स५०७ लॅपटॉप

असुसचे विवोबुक एक्स५०७ लॅपटॉप

googlenewsNext

असुस कंपनीने पेटीएम मॉलसोबत सहकार्याचा करार केला असून याच्या अंतर्गत विवोबुक एक्स५०७ हे लॅपटॉप ग्राहकांना सादर केले आहे. असुस आणि पेटीएममध्ये सहकार्याचा करार करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून असुसची विविध उत्पादने या ऑनलाईन मंचावरून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय असुसच्या देशभरातील शॉपीजमध्ये डिजीटल एक्सपेरियन्स झोन तयार करण्यात येणार असून यात पेटीएम कंपनीची पीओएस (पॉइंट ऑफ सेल्स) प्रणाली लावण्यात येणार आहे. दरम्यान, असुस व पेटीएम मॉलमध्ये सहकार्याचा करार जाहीर होताच असुसने विवोबुक एक्स५०७ हे लॅपटॉप बाजारपेठेत लाँच केले आहे.

विवोबुक एक्स५०७ या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि नॅनोएज या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याला एचडी आणि फुल एचडी या दोन्ही पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यामध्ये इंटेलचा कोअर आय३ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ८ जीबीपर्यंत असून स्टोअरेजसाठी १ टेराबाईटपर्यंतचे पर्याय देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले असून याच्या मदतीने विंडोज हॅलोवर लॉगीन करता येणार आहे. हा लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे.  यामध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती अवघ्या ४९ मिनिटांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

विवोबुक एक्स५०७ या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथसह एचडीएमआय, युएसबी, कार्ड रीडर, ऑडिओ जॅक आदी पर्याय देण्यात आले आहेत. या लॅपटॉपच्या विविध व्हेरियंटचे मूल्य २१,९९० रूपयांपासून सुरू होणारे असून प्रारंभीच्या ग्राहकांना २ हजार रूपयांच्या कॅशबॅकची सवलत देण्यात येत आहे.

Web Title: Asus' VivoBus X507 Laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.