चीनमधील फॉक्‍सकॉनच्या कारखान्यातून 20 हजार कर्मचारी पळाले, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:29 PM2022-11-25T17:29:35+5:302022-11-25T17:30:40+5:30

चीनच्या झेंझोऊमध्ये फॉक्सकॉनचा iphone बनवण्याचा सर्वात मोठा कारखाना आहे.

20 thousand employees ran away from the factory of Foxconn in China, | चीनमधील फॉक्‍सकॉनच्या कारखान्यातून 20 हजार कर्मचारी पळाले, कारण काय..?

चीनमधील फॉक्‍सकॉनच्या कारखान्यातून 20 हजार कर्मचारी पळाले, कारण काय..?

Next


Foxconn In Trouble: चीनमधीलअॅपल आयफोनची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या फॉक्सकॉन फॅक्ट्रीशी संबंधित वाद वाढत आहे. ताज्या प्रकरणात, 20,000 हून अधिक कर्मचार्‍यांनी चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ येथील फॉक्सकॉन कारखाना सोडला आहे. यातील बहुतेक कर्मचारी नवीन होते. फॉक्सकॉनशी संबंधित एका सूत्राने शुक्रवारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी प्लांट सोडून गेल्याने फॉक्सकॉनच्या अडचणी वाढल्या आहेत. माहिती देणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस कंपनीचे आयफोन उत्पादनाचे लक्ष्य गाठणे कठीण झाले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून फॉक्सकॉनच्या या कारखान्यातील कर्मचारी कंपनीच्या धोरणांमुळे नाराज आहेत. या संपूर्ण वादावर फॉक्सकॉन कंपनीने अधिकृतपणे वक्तव्य देण्यास नकार दिला आहे.

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने गुरुवारी राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना 10,000 युआन (युआन) म्हणजेच $1,396 देण्याची ऑफर दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी रागाच्या भरात प्लांट सोडला. पगाराशी संबंधित तांत्रिक चुकीबद्दल कंपनीने नवनियुक्त कर्मचाऱ्यांची माफी मागितली होती आणि या कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. कंपनीच्या वृत्तीमागे कामगार आणि पोलिसांमध्ये झालेली हिंसक हाणामारी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आज चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गर्दी दिसत आहे. लोक सामान घेऊन बससाठी लांबच लांब रांगेत उभे आहेत. 

ऑक्टोबरमध्ये COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना अंमलात आणल्यानंतर, फॉक्सकॉन कंपनीने बोनस आणि उच्च पगाराचे आश्वासन देत नोव्हेंबरच्या सुरुवातीस हायरिंग ड्राइव्ह सुरू केला. मात्र, कोविडच्या कडक नियमांमुळे कर्मचार्‍यांना एकाकी वाटू लागले आणि प्लांटची स्थिती पाहून राग आला, अनेक कर्मचार्‍यांनी स्थलांतराचा मार्ग निवडला. मध्य चीनमध्ये असलेल्या फॉक्सकॉनच्या या कारखान्याला आयफोन सिटी म्हणूनही ओळखले जाते. येथे 2 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. जगातील सर्वात जास्त आयफोन या कारखान्यात असेंबल केले जातात. 

Web Title: 20 thousand employees ran away from the factory of Foxconn in China,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.