निवडणुकीसाठी प्रशासनाला मिळेना कर्मचारी

By admin | Published: January 24, 2017 01:39 AM2017-01-24T01:39:38+5:302017-01-24T01:39:38+5:30

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Administration to get election for election | निवडणुकीसाठी प्रशासनाला मिळेना कर्मचारी

निवडणुकीसाठी प्रशासनाला मिळेना कर्मचारी

Next

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना कार्यालयेदेखील देण्यात आली आहेत. परंतु सध्या निवडणूक कामासाठी कर्मचारीच नियुक्त न केल्याने निवडणूक कामांचा खोळंबा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका एकाच वेळी घेतल्या आहेत. या तीनही निवडणूक कामांसाठी तब्बल ५६ हजार कर्मचा-यांची गरच आहे. यामध्ये जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांसाठी तब्बल २४ हजार कर्मचा-यांची गरज आहे. पुणे महापालिकेसाठी २० हजार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १२ हजार कर्मचा-यांची गरज आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासकीय शाळांमधील शिक्षक आदी सर्व कर्मचारी हाताशी असल्याने कर्मचा-यांची कमतरता नाही. पण पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १२ हजार कर्मचा-यांची आवश्यकात असून, सध्या त्याच्याकडे साडेआठ हजार कर्मचारी आहेत. यामुळे त्यांनी शिरुर, आंबेगाव तालुक्यातील काही कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पुणे महापालिकेसाठी पाच ते सहा हजार कर्मचारी बाहेरचे घ्यावे लागणार आहेत. या दोन्ही महापालिकांना कर्मचा-यांची चणचण भासत आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने ग्रामीण भागातील कर्मचा-यांची मागणी केली आहे. परंतु ग्रामीण भागातील बहुतेक सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेसाठीच लागणार असल्याने हे कर्मचारी देण्यास जिल्हाधिका-यांनी नकार कळविला आहे. महापालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागांसाठी एका उपजिल्हाधिका-यांची निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक प्रभागासाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या करून आठ दिवस झाले आहे. पण निवडणुकीसाठी आवश्यक असलेला कर्मचारीच अद्याप नियुक्त न केल्याने निवडणुकीच्या कामाची पूर्व तयारी करण्यासाठी अधिका-यांची मोठी अडचण झाली आहे. कार्यालयात जाऊन काय करायचा असा प्रश्न देखील अनेक अधिका-यांना पडला आहे. यामुळे महापालिकांना त्यांच्याच हद्दीतील खाजगी अस्थापनावरील कर्मचारी निवडणूक कामासाठी घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Administration to get election for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.