उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:50 AM2018-10-26T10:50:20+5:302018-10-26T10:51:39+5:30

भीमानगर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ...

Water released from the Ujani dam; The water reached to the shaver | उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी

उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी

Next
ठळक मुद्देसोलापूरला पाणी पोहोचण्यासाठी सात दिवस लागणार ६१५० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमानदीत होत आहेशहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर

भीमानगर : उजनी धरणातूनसोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ८ वाजता शेवरे व नरसिंहपूर या बंधाºयांपर्यंत पोहोचले असून शुक्रवारी दिवसभरात बेंबळे व वाफेगाव या दोन गावांना जोडणाºया बंधाºयात पोहोचेल.

अजूनही सहा ते सात दिवस सोलापूरलापाणी पोहोचण्यासाठी कालावधी लागणार आहे. बुधवारी सकाळी १,६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वाढ करून ३,५५० क्युसेक केले तर दुपारी पुन्हा वाढ करून १२ वाजता ४५५० क्युसेक सोडले. ४,५५० क्युसेक नदीला पाणी सोडले आहे तर वीजनिर्मितीसाठी १,६०० असे एकूण ६१५० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमानदीत होत आहे.

सध्याला सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना चाºयासाठी व पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर गेली आहे, तर टाकळीतही पाणीसाठा अल्पच आहे. त्यामुळे सोलापूरला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच आॅक्टोबर हिट खूप जाणवू लागला आहे. आता कालव्याला पण पाणी सोडावे, अशी शेतकºयातून मागणी होत आहे.

  • - एकूण पाणीपातळी ४९६.४५५ मीटर
  • - एकूण पाणीसाठा ३१९५.९६ दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा १३९३.१५ दलघमी
  • - टक्केवारी ९१.८२ टक्के
  • - एकूण टीएमसी ११२.८५
  • - उपयुक्त टीएमसी ४९.१९
  • - भीमानदी ४५५० क्युसेक
  • - वीजनिर्मिती १६०० क्युसेक

Web Title: Water released from the Ujani dam; The water reached to the shaver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.