VIDEO - शेततळ्याच्या आधारे फुलविली डाळिंबाची बाग, घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 02:17 PM2017-12-23T14:17:29+5:302017-12-23T14:18:12+5:30

शेततळ्यातील पाण्याच्या आधारे डाळिंबाची बाग फुलवून त्याद्वारे लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतक-याने केली आहे.

VIDEO - The income of millions of Rupees grown on the basis of the farmland, the flowering pomegranate garden | VIDEO - शेततळ्याच्या आधारे फुलविली डाळिंबाची बाग, घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न

VIDEO - शेततळ्याच्या आधारे फुलविली डाळिंबाची बाग, घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न

Next

मंगरुळपीर -  दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेततळ्यातील पाण्याच्या आधारे डाळिंबाची बाग फुलवून त्याद्वारे लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतक-याने केली आहे. डिगांबर गिरी, असे या शेतक-याचे नाव आहे. मंगरूळपीर तालुक्यातील डिगांबर गिरी यांच्याकडे मंगळसा शिवारात वडिलोपार्जित २५ एकर शेती आहे. 

प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असलेले डिगांबर गिरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतात. साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतीमधील १३ एकरात डाळिंबाची लागवड केली. 

हे फळपिक वाढविण्यासाठी सतत पावसाळा किंवा विहिरीच्या भरवशावर राहावे लागू नये म्हणून त्यांनी सामुहिक शेततळे योजनेंतर्गत शेतात शेततळे खोदून घेतले. हे शेततळे ४४ चौरस मीटर आकाराचे असून, यामधील पाण्याच्या आधारे ते डाळिंबाची बाग फुलवितात. या डाळिंबामधून त्यांना आजवर एक कोटीचे उत्पन्न घेतले आहे. 

Web Title: VIDEO - The income of millions of Rupees grown on the basis of the farmland, the flowering pomegranate garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.