टेंभुर्णीत टायर शोरूम फोडून ३ लाख ८० हजाराचा माल लंपास, पोलीसात गुन्हा दाखल, तपास सुरू ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:19 PM2018-01-08T18:19:12+5:302018-01-08T18:20:03+5:30

 शोरूमचे मालक  दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले

Tumblr tire showroom breaks 3 lakh 80 thousand goods, lapses in poles, investigations begin! | टेंभुर्णीत टायर शोरूम फोडून ३ लाख ८० हजाराचा माल लंपास, पोलीसात गुन्हा दाखल, तपास सुरू ! 

टेंभुर्णीत टायर शोरूम फोडून ३ लाख ८० हजाराचा माल लंपास, पोलीसात गुन्हा दाखल, तपास सुरू ! 

Next
ठळक मुद्दे- टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- टेंभुर्णी परिसरात चोºयांचे प्रमाण वाढले- रात्रीची गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
टेभुर्णी दि ८ - येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील बालाजी ट्रेंडर्स या टायर शोरूमचे  शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह ३ लाख ८१ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आली या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.हि घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान घडली असून सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवार दि ८ जानेवारी रोजी टेंभुर्णी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
    याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बालाजी ट्रेंडर्स हे  एम. आर. एफ. कंपनीच्या टायरचे शोरूम असून अज्ञात चोरट्यानी शोरूमचे शटर उचकटून शोरूममधील १५ हजार रुपये रोख रक्कम, सोनी कंपनीचा लॅपटॉप किंमत २५ हजार रुपये, सी.सी. टीव्हीचा एलसीडी व डी. व्ही.आर. किंमत २२ हजार रुपये, असा एकूण ६२ हजार रुपयाचा ऐवज. तसेच एम. आर.एफ. कंपनीचे वेगवेळ्या साईज चे २२४ टायर किंमत ३ लाख १९ हजार ७०० रुपये चोरीस असा एकूण ३ लाख ८१ रुपयाचा माल चोरीस गेला आहे.
शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे शोरूम बंद करून घरी गेल्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी या  कालावधीत   ही धाडशी चोरीची घटना घडली आहे.  शोरूमचे मालक  दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले .याची फिर्याद संदीप ढेरे यांनी दिली असून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने व्यापारी वगार्तून खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूवीर्ही झालेल्या एकाही चो?्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे चोरट्याचे धाडस वाढतच चालले आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक पी. के. मस्के करत आहेत.

Web Title: Tumblr tire showroom breaks 3 lakh 80 thousand goods, lapses in poles, investigations begin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.