‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:48 PM2018-01-08T17:48:26+5:302018-01-08T17:52:15+5:30

किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माहितीपटास पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

'Tragedy of Nudity', National Award for the documentary, Kirloskar Vasundhara International Environment Film Festival, Solapur | ‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे येथे बालगंधर्व सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदित्य कौशिक यांच्या हस्ते ऋतुराज स्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात देशभर सादर केलेल्या लघुपट व माहितीपट स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालाया स्पर्धेतही ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम यांच्या माहितीपटास तृतीय पारितोषिक


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८  : किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माहितीपटास पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
पुणे येथे बालगंधर्व सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदित्य कौशिक यांच्या हस्ते ऋतुराज स्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी किर्लोस्कर उद्योग समूहाचे अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, एस.नल्लामुथू, वीरेंद्र चित्राव, प्रणिता दाडकर, गुरूमित सपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहकार्याने सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाने आॅगस्ट-२0१७ मध्ये ‘नदी आणि निगडित प्रश्न’ या विषयावर माहितीपट आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतही ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम यांच्या माहितीपटास तृतीय पारितोषिक मिळाले होते. दि.१६ आॅगस्ट २0१७ रोजी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले होते. किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात देशभर सादर केलेल्या लघुपट व माहितीपट स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला असून, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे त्याचे स्वरूप आहे. संकुलाचे संचालक प्रा. डॉ. इ.एन.अशोककुमार, विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, प्रा. मधुकर जक्कन यांनी कौतुक केले. 

Web Title: 'Tragedy of Nudity', National Award for the documentary, Kirloskar Vasundhara International Environment Film Festival, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.