बदलत्या वस्तींची कहाणी; जगजीवनराम झोपडपट्टीने घडविले तहसीलदारांसह अनेक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:33 PM2019-01-25T14:33:10+5:302019-01-25T14:35:20+5:30

काशिनाथ वाघमारे सोलापूर : दोन वेळच्या अन्नासाठी सेंट्रिंगच्या कामावर जाणारी मंडळी बांधकाम व्यावसायिक झाली. रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुले तहसीलदार ...

Story of changing climbers; Many officers, including Tehsildars, were created by Jagjeevan Ram slum | बदलत्या वस्तींची कहाणी; जगजीवनराम झोपडपट्टीने घडविले तहसीलदारांसह अनेक अधिकारी

बदलत्या वस्तींची कहाणी; जगजीवनराम झोपडपट्टीने घडविले तहसीलदारांसह अनेक अधिकारी

Next
ठळक मुद्देदोन वेळच्या अन्नासाठी सेंट्रिंगच्या कामावर जाणारी मंडळी बांधकाम व्यावसायिक झालीरॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुले तहसीलदार झालीअस्वच्छतेचा परिसर आता स्वच्छमय परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : दोन वेळच्या अन्नासाठी सेंट्रिंगच्या कामावर जाणारी मंडळी बांधकाम व्यावसायिक झाली. रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुले तहसीलदार झाली. कोणीही जवळ केले नाही, पण राजकारणी झाले. आज पत्र्यांच्या घरांचाही कायापालट झाला आहे.  अस्वच्छतेचा परिसर आता स्वच्छमय परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

मोदी असे त्या परिसराचे नाव़ १२ हजार लोकसंख्येच्या या वस्तीमध्ये बांधकाम व्यावसायिक, तहसीलदारासह अनेक नगरसेवकही घडले़ शिवाजी चौक, शामा नगर, नृसिंह नगर, कस्तुरबा नगर असे अनेक नगर या मोदी परिसरात मोडतात़ पाच हजारांवरची लोकवस्ती आज जवळपास १२ हजारांवर गेली आहे़ या परिसराने आता आपली ओळखही बदलली आहे़ अशिक्षितांची सोसायटी आता शिक्षित वर्गाची वसाहत म्हणून ओळखली जाऊ लागली़ पत्रकार भवन - मोदी पोलीस चौकी रस्त्याने मोदी परिसराचे दोन भाग केले़ मोदी परिसरात राहणाºया मोची समाजाने आता आपली ओळख बदलली आहे़ मोलमजुरीच्या शोधात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या लोकांना मोदी परिसराचा आधार लाभला.

या लोकांना सुरुवातीला अवतीभोवतीच्या जुन्या मिलमध्ये काम मिळाले़ मिल बंद पडल्यानंतर ते बांधकम क्षेत्रात मजुरीसाठी वळाले़ या परिसराला साहित्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे़ काही साहित्यिकही या परिसरातून घडले आहेत़

...अन् नामकरण झाले
- १९७१-७२ चा काऴ दुष्काळी स्थितीत आपल्या समाजबांधवांची स्थिती पाहावी म्हणून माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी मोदी परिसराचा दौरा केला़ पहिल्यांदाच मोची समाजातील मोठ्या व्यक्तीचा या झोपडपट्टीला पदस्पर्श झाला़ समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली़ त्यांच्याकडूनच या झोपडपट्टीला ‘बाबू जगजीवनराम झोपडपट्टी’ असे नामकरण झाले़ अलीकडे या मोठ्या रस्त्याने मोदी परिसराचे दोन भाग झाले़ न्यू जगजीवनराम झोपडपट्टीत इंदिरा आवास योजनेतून शंभर घरे बांधली गेली आणि याच्या उद्घाटनासाठी लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमारी यांच्या कन्या येऊन गेल्या़

तहसीलदार ते स्थायी समिती सभापती
- या परिसरातून अनेक मोठ्या व्यक्ती घडल्या. तहसीलदार रामलिंग कवडे, माजी महिला तहसीलदार साबळे यांच्यासह स्थायी समितीचे तत्कालीन सभापती सुंदरलाल कमलापुरे, नगरसेवक नागनाथ वाघमारे, डॉ़ बंगरगी, आशा म्हेत्रे, मीनाक्षी कंपली, नरसिंग क ोळी अशी राजकारणी लोकं घडली. याबरोबरच शिक्षण क्षेत्रातून प्रा़ विष्णू विटेकर, प्रा़ रेवणसिद्ध विटेकर आणि आता प्राध्यापिका ज्योती वाघमारे अशी नवीपिढी घडली आहे.

एकेकाळी बांधकाम करणारे काही लोक आज बांधकाम व्यावसायिक झाले, असंख्य मजुरांना रोजगारही दिला़ सिद्राम म्हेत्रे, संजय म्हेत्रे, शंकर म्हेत्रे असे बांधकाम व्यावसायिक एकेकाळी मोलमजुरीच्या शोधात होते़ तसेच लेप्रसीचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ़ दिन्नी, महापालिका अधिकारी रामचंद्र आसादेंसह अनेक लोक शिक्षणाच्या बळावर घडले़ उद्योजक बाबुराव म्हेत्रे यांनी चिंंचोळी एमआयडीसीत आज उद्योग थाटला आहे़ काँग्रेसकडून सुंदरलाल कमलापुरे यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती़ याबरोबरच या परिसरातील अनेक लोक महापालिकेत काम करताहेत़ काही मुले इंजिनियर झाली आहेत़ 

अस्वच्छतेचा परिसर झाला स्वच्छमय 
- साधारण ९० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या वसाहतीला कोणत्याच मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या़ झोपडपट्टी असल्याच्या करणास्तव वीज, पाणीही कायमस्वरूपी दिले जात नव्हते़ कुठे एका चौकात आजही पाच कंदील पाहायला मिळतो़ ही ओळख अजून पुसलेली नाही़ महापालिकेने काही सेवासुविधा दिल्या, अंतर्गत रस्ते झाले़ 

Web Title: Story of changing climbers; Many officers, including Tehsildars, were created by Jagjeevan Ram slum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.