सोलापुरी तरुणाने ट्रॅफिक पोलिसाला शिकवला कायदा, पाहा धम्माल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 14:12 IST2018-10-12T14:10:20+5:302018-10-12T14:12:33+5:30
शहरातील सिद्धेश्वर कारखाना रोडवर 24 सप्टेंबरच्या सकाळी वाहतूक पोलिसांनी एका तरुणाला हटकलं. या तरुणाकडे लायसन्सची मागणी केली. मात्र,

सोलापुरी तरुणाने ट्रॅफिक पोलिसाला शिकवला कायदा, पाहा धम्माल व्हिडीओ
सोलापूर - येथील एका तरुणानं ट्रॅफिक पोलिसांशी घातलेल्या हुज्जतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सगळ्यात आधी सोलापूर लोकमतच्या फेसबुक पेजवर झळकलेल्या या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पडतोय. या व्हिडीओतील तरुणाचा तोरा, सोलापुरी भाषेतला झटका आणि पोलिसी हिसका पाहून तुमची हसून हसून पुरेवाट होईल.
शहरातील सिद्धेश्वर कारखाना रोडवर 24 सप्टेंबरच्या सकाळी वाहतूक पोलिसांनी एका तरुणाला हटकलं. या तरुणाकडे लायसन्सची मागणी केली. मात्र, तरुणाकडे लायसन्स नसल्यामुळे पोलीस आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादात युवक ट्रॅफिक पोलिसाला कायदा समजावून सांगत आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माझी गाडी घेऊन जाऊ शकत नाहीत. मी, गाडीची कागदपत्रे आणि लायसन्स मागवून घेत आहे, पण तुम्ही गाडीला हात लावायचा नाही, अशा शब्दात या तरुणाने ट्रॅफिक पोलिसाला कायद्याचे धडे दिले. यावेळी उपस्थितांनी पोलीस आणि तरुणाचा हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटपर्यंत तरुण त्याच्या मतावर ठाम राहिला. त्याने ट्रॅफिक पोलिसाला आपली गाडी नेऊ दिलीच नाही.
संवादाचं चित्रण थेट लोकमतने कॅमेऱ्यात कैद केलं.
या व्हिडीओला 13 लाख 50 हजार 905 लोकांनी पसंती तर दिलीच आहे शिवाय 7 हजार 200 जणांनी लाईक केला. 587 जणांनी ही पोस्ट शेअर केलीय तर 408 जणांनी त्यावर कॉमेंट्स दिल्यात. 9 हजार 750 जणांनी हा व्हिडीओ पूर्णत: पाहिलाय.