सोलापूर सिध्देश्वर यात्रा : हर्र बोला हर्र च्या जयघोषात सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:23 PM2018-01-12T12:23:17+5:302018-01-12T12:29:00+5:30

बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष  करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या  यात्रेला तैलाभिषेकाने  शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. 

Solapur Siddeshwar Yatra: Thillabhishek to 68 Linguists Founded by Siddheshwar Maharaj | सोलापूर सिध्देश्वर यात्रा : हर्र बोला हर्र च्या जयघोषात सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक

सोलापूर सिध्देश्वर यात्रा : हर्र बोला हर्र च्या जयघोषात सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक

googlenewsNext
ठळक मुद्दे सोलापूरच्या पंचक्रोशीत श्री सिद्धरामेश्वरांनी  केलेल्या ६८ लिंगाना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला पांढ-या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेतनंदीध्वजाला खोब-याचा हार व बाशिंग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या

 
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष  करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या  यात्रेला तैलाभिषेकाने  शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. 
     सोलापूरच्या पंचक्रोशीत श्री सिद्धरामेश्वरांनी  केलेल्या ६८ लिंगाना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. पांढ-या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नंदीध्वजाच्या लक्षवेधी मिरवणुकीने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तैलाभिषेकासाठी गुरुवारी मध्यरात्रीच मानाच्या पहिल्या व दुस-या नंदीध्वजाला साज चढविण्यात आला होता. उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुस-या नंदीध्वजांची  मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,उज्वलाताई शिंदे,आमदार प्रणिती शिंदे,स्मृति शिंदे,सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली . 
     नंदीध्वज मिरवणुकीत सर्वात पुढे पंचाचार्यांचा ध्वज होता. पाच पिठांचा हा ध्वज प्रतीक  मानण्यात येतो. त्यानंतर सनई-चौघडा , बग्गी , सिद्धेश्वरांची पालखी व त्यापाठोपाठ आकर्षक आणि डौलदारपणाने सात नंदीध्वज मार्गस्थ  होत होते. या यात्रेत झेंडा ग्रुप अत्यंत महत्वाची भूमिका  बजावतात.ज्याठिकाणी नंदीध्वज थांबविले जातात. त्यावेळी सर्वांनी थांबावे असा इशारा या ग्रुपमार्फत लाल झेंडा फडकावून देण्यात येतो. त्यानुसार सिद्धेश्वर भक्त आणि नंदीध्वज मार्गक्रम करीत होते. सिद्धरामेश्वरांचा अखंड जयघोष यावेळी सुरु होता. 
     नंदीध्वजाचे दर्शन घेण्यासाठी व बोललेले नवस फेडण्यासाठी मिरवणूक मार्गावर भक्तांची दुतर्फा झाली होती, तसेच नंदीध्वजाला खोब-याचा हार व बाशिंग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. 

Web Title: Solapur Siddeshwar Yatra: Thillabhishek to 68 Linguists Founded by Siddheshwar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.