चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मद्यपि तृतीयपंथीयाचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:41 PM2019-06-08T12:41:40+5:302019-06-08T12:47:20+5:30

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील घटना ; अश्लील भाषेतील शब्दप्रयोग करताना प्रवाशांना झालाय नाहक त्रास

solapur railway station Chennai Express | चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मद्यपि तृतीयपंथीयाचा उच्छाद

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मद्यपि तृतीयपंथीयाचा उच्छाद

Next
ठळक मुद्देभरपूर दारू ढोसलेल्या या तृतीयपंथीयाने सोलापूर स्थानकावरुन सर्वसाधारण डब्यात प्रवेश केलाडब्यात चढल्यापासून तो विचित्र हावभाव करताना प्रवाशांशी अश्लील संभाषण करताना जबरदस्तीने पैसे मागू लागलाउन्हाळी सुटीनिमित्त सध्या सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत

कुर्डूवाडी : चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एका मद्यपि तृतीयपंथीयाने अक्षरश: उच्छाद मांडत प्रवाशांना वेठीस धरले. अश्लील भाषेतील शब्दप्रयोग करताना प्रवाशांना नाहक त्रास होत असताना ड्यूटीवरील रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी काहीच करू शकले नाहीत. भरपूर दारू ढोसलेल्या या तृतीयपंथीयाने सोलापूर स्थानकावरुन सर्वसाधारण डब्यात प्रवेश केला. डब्यात चढल्यापासून तो विचित्र हावभाव करताना प्रवाशांशी अश्लील संभाषण करताना जबरदस्तीने पैसे मागू लागला. कोणी रुपया-दोन रुपये दिले अथवा पाच रुपये... तर तो न घेता जादा पैशाची मागणी करू लागला. काही प्रवासी संतप्त झाले; मात्र त्याच्या प्रकारापुढे नतमस्तकही होताना दिसत होते. एका प्रवाशाला त्याच्या शिव्याशापापासून सुटका होण्यासाठी त्याचे पायही धरावे लागले. प्रत्येक डबा आणि डब्यातील प्रत्येकाकडून जणू तो पैसे घेऊनच पुढे जात होता. उन्हाळी सुटीनिमित्त सध्या सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. एका डब्यातून तृतीयपंथीय दीड ते दोन हजार रुपये गोळा करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही जण परिवारासमवेत प्रवेश करीत होते. कुटुंबातील सदस्य असतील तर त्या कुटुंब प्रमुखाला या तृतीयपंथीयाने अक्षरश: वेठीसही धरले. परिवारातील सदस्यांचे तोंड पाहून जो-तो ५० ते १०० रुपयेही त्याच्या हातात टेकवितानाही चित्र दिसत होते. काही प्रवाशांकडे पैसे नव्हते अथवा सुटे पैसे नव्हते. अशांनाही त्याने सोडले नाही. कोणी पैसे देण्यास नकार दिला तर त्यांच्या खिशात हात घालून अक्षरश: या तृतीयपंथीयाने जणू लूटच केली. सर्वच डब्यांमध्ये हा प्रकार घडत असताना लोहमार्ग, आरपीएफ जवान आणि रेल्वेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी मात्र मूग गिळून गप्प होते. प्रवाशांना नाहक होणारा त्रास बंद व्हावा, यावर रेल्वे पोलीस व प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. या बरोबरच अवैध व्हेंडरचा त्रासही होतो. पाणी व खाद्यपदार्थांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी व प्रवाशांची यातून सुटका करावी. -संजय टोणपे, अध्यक्ष, सोलापूर पुणे प्रवासी संघटना. रेल्वे प्रवाशांना अशा तृतीयपंथीयांचा नेहमीच त्रास होतो. आजपर्यंत अशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस कधीच ठोस पावले उचलली नाहीत. तृतीयपंथीयांचा कायमस्वरुपी बंदोबस्त होण्याची गरज आहे. 
- गंगाधर वळदड्डे,

Web Title: solapur railway station Chennai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.