सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात औषधांचा तुटवडा, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उघडकीस आणला प्रकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:33 PM2018-01-01T16:33:23+5:302018-01-01T16:41:25+5:30

 मलेरिया, डेंग्यूच्या साथीचा प्रभाव जाणवू लागल्याने या आरोग्य केंद्रासाठी औषधाचा तुटवडा भासू नये यासाठी गरजेनुसार औषध खरेदी करण्याबाबत ७ आॅक्टोबर २0१७ रोजी आरोग्य अधिकाºयांना कळविण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य अधिकाºयांनी २0 लाखांची औषधे खरेदीसाठी टेंडर काढले

Solapur corporation's dispensary of drug scam, corporator Anand Chandan Shivai revealed the type! | सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात औषधांचा तुटवडा, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उघडकीस आणला प्रकार !

सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात औषधांचा तुटवडा, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उघडकीस आणला प्रकार !

Next
ठळक मुद्देटेंडर प्रक्रिया करूनही मनपाच्या आरोग्य विभागाने औषध खरेदी केली नाहीरूग्णांना औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यावर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची शहरातील औषध भांडाराला भेट पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी असताना त्यांच्याच शहरात ही विदारक स्थिती असल्याबाबत नापसंती व्यक्त केली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १  : टेंडर प्रक्रिया करूनही मनपाच्या आरोग्य विभागाने औषध खरेदी न केल्याने गेल्या चार महिन्यांपासून दवाखान्यात औषधांचा तुटवडा आहे. चक्क औषध भांडार रिकामे झाल्याचा प्रकार नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी शनिवारी उघडकीस आणला.
रूग्णांना औषधे मिळत नसल्याच्या  तक्रारी आल्यावर सायंकाळी चंदनशिवे यांनी डफरीन हॉस्पिटलमधील आरोग्य विभागाच्या प्रमुख औषध भांडाराला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना भांडारातील औषधाचे रॅक रिकामे आढळले. आयुक्तांनी आदेश देऊनही औषधांची खरेदी होत नाही. प्रशासनावर भाजप पदाधिकाºयांचा अंकुश नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी असताना त्यांच्याच शहरात ही विदारक स्थिती असल्याबाबत नापसंती व्यक्त केली.  
 मलेरिया, डेंग्यूच्या साथीचा प्रभाव जाणवू लागल्याने या आरोग्य केंद्रासाठी औषधाचा तुटवडा भासू नये यासाठी गरजेनुसार औषध खरेदी करण्याबाबत ७ आॅक्टोबर २0१७ रोजी आरोग्य अधिकाºयांना कळविण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य अधिकाºयांनी २0 लाखांची औषधे खरेदीसाठी टेंडर काढले. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी या टेंडरला १५ आॅक्टोबर रोजी मान्यता दिली. २ नोव्हेंबर रोजी औषध खरेदीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. 
यातून आलेल्या पाच पुरवठादारांपैकी दोन पुरवठादारांची कागदपत्रे अपुरी होती. तीन पात्र पुरवठादारांचे टेंडर उघडण्यात आले. यात गगन फार्माकडून ३३ प्रकारची औषधे, जिनोव्हा बायोटेक यांच्याकडून ८३ प्रकारची औषधे अशी ११७ प्रकारची औषधे खरेदी करण्यासाठी मेडिकल बोर्डाने कार्यवाही ठेवायची होती. पण असे झालेच नाही. 

Web Title: Solapur corporation's dispensary of drug scam, corporator Anand Chandan Shivai revealed the type!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.