सोलापूरात ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा, मुलांमध्ये पंजाब तर मुलींमध्ये चंदीगड राज्याला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदके : मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:59 PM2018-02-05T15:59:57+5:302018-02-05T16:02:20+5:30

 क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर,सोलापूर शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त  विद्यमाने आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यांने केगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्या.

In the Solapur 63th National School Fencing Competition, Punjab has won the title of the state of Punjab, and Maharashtra won 1 gold, 1 silver and 6 bronze medals. | सोलापूरात ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा, मुलांमध्ये पंजाब तर मुलींमध्ये चंदीगड राज्याला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदके : मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद

सोलापूरात ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा, मुलांमध्ये पंजाब तर मुलींमध्ये चंदीगड राज्याला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदके : मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद

Next
ठळक मुद्देकेगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्यामुलांमध्ये १९ गुणांसह महाराष्ट्राला उपविजेतेपद१ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर महाराष्ट्राला समाधान मानावे लागलेवैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश जकाते  ( सांगली ) याला सुवर्णपदक मिळाले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ :  राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत मुलांमध्ये २५ गुणांसह "पंजाब" तर मुलींमध्ये २१गुणांसह "चंदीगड " राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये चंदीगड आणि पंजाब राज्याला प्रत्येकी २१ गुण मिळाले मात्र चंदीगडला २  सुवर्णपदके मिळाल्याने चंदीगडला सर्वसाधारण विजेतेपद बहाल करण्यात आले. मुलांमध्ये १९ गुणांसह महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले. १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर महाराष्ट्राला समाधान मानावे लागले.वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश जकाते  ( सांगली ) याला सुवर्णपदक मिळाले.
 क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर,सोलापूर शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त  विद्यमाने आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यांने केगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्या.
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुवर्णपदक विजेते,महाराष्ट्राचे प्रशिक्षक अजिंक्य दुधारे , सिंहगडचे प्राचार्य डॉ.एस.डी. नवले,सोलापूर जिल्हा कुस्ती संघटनेचे सचिव भरत मेकले आणि जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी आणि मेडल प्रदान करण्यात आले.मुलांमध्ये पंजाबला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला उपविजेतेपद तर हरियाणा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.मुलींमध्ये चंदीगडला सर्वसाधारण विजेतेपद,पंजाबला उपविजेतेपद आणि हरियाणाला तिस?्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.याशिवाय वैयक्तिक परितोषिकेही देण्यात आली.प्रास्तविक भाषणात जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्पर्धा भरविण्यामागचा उद्देश सांगितला. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले आणि त्यांच्या टीमचे नाईक यांनी आभारही मानले  यावेळी भारतीय तलवारबाजी असो.चे खजिनदार अशोक दुधारे,महाराष्ट्राचे सचिव डॉ.उदय डोंगरे,जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे,  सुजाण थॉमस,आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य दुधारे, निरीक्षक विकास पाठक , संघटनेचे राजेंद्र माने, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे,महिला प्रशिक्षक संगीता येवतीकर, आमसिध्द सोलनकर, बाळासाहेब बालटे , गणेश खंडागळे, जयश्री मदने-पाटील,उपप्राचार्य प्रकाश नवले,करीम मुजावर,किरण वायचळ,पवन भोसल,जुबेर शेख,नदीम शेख, अनिल देशपांडे,प्रमोद चुंगे, दशरथ गुरव,धर्मराज कट्टीमणी,हेमंत शेटे,सत्येन जाधव,शिवानंद सुतार ,राजू प्याटी,  देवेन्द्र कांबळे,  विनय जाधव यांच्यासह सिंहगडची टीम उपस्थित होती. सायली जाधव आणि शर्वरी ठोंगे यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
--------------------
मुलांच्या "फॉइल,सेबर आणि ईपी क्रीडा प्रकारात - हरियाणा- २ सुवर्ण,तामिळनाडू १ रौप्य आणि १ कांस्य,महाराष्ट्र १ सुवर्ण,१रौप्य आणि ३ कांस्य,पंजाब २ सुवर्ण , ३ रौप्य आणि २ कांस्य, केरळ १ सुवर्ण, दिल्ली १ कांस्य, विद्याभारती १ कांस्य,जम्मू काश्मीर २ कांस्य , सिबीएसई १ रौप्य आणि तेलंगणाला १ रौप्य पदक मिळाले.
--------------------------------------- 
मुलींमध्ये "हरियाणाला १ सुवर्ण,१ रौप्य आणि १ कांस्य,चंदीगड २ सुवर्ण आणि १ कांस्य,महाराष्ट्र ३ कांस्य, पंजाब १ सुवर्ण,२ रौप्य आणि १ कांस्य, विद्याभारतीला १ कांस्य, 
गुजरात १ कांस्य, तामिळनाडू १ रौप्य, मध्यप्रदेश ३ कांस्य,जम्मू काश्मीर १ सुवर्ण आणि केरळ राज्याने १ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावले.
---------------------------------------
सिंहगडमध्ये सर्वाधिक स्पर्धा 
सिंहगड इन्स्टिट्यूटने आतापर्यंत भूमी अभिलेख पुणे विभाग स्पर्धा, ३५० खेळाडू,वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी ८०० खेळाडू,राज्यस्तरीय मुली हॅण्डबॉल ३०० खेळाडू, राष्ट्रीय शालेय मल्लखांब २०० खेळाडू आणि मागील तीन दिवसात ३५० खेळाडूंचा सहभाग असलेली ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पधेर्चे यशस्वी नियोजन करून क्रीडा क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.सोलापुरात होणाºया स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यासाठी क्रीडा संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन सिंहगडचे संचालक संजय नवले यांनी केले आहे.

Web Title: In the Solapur 63th National School Fencing Competition, Punjab has won the title of the state of Punjab, and Maharashtra won 1 gold, 1 silver and 6 bronze medals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.