सिद्धेश्वर यात्रा : नंदीध्वजांची निघणार मिरवणूक,६८ लिंगांना आज तैलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:23 AM2018-01-12T11:23:44+5:302018-01-12T11:26:47+5:30

ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस उद्या शुक्रवार दि. १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, ‘श्री’नी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून निघणार आहे.

Siddheshwar Yatra: Nandvandhagaj's outer procession, 68 Lingas today, Thilabhishak | सिद्धेश्वर यात्रा : नंदीध्वजांची निघणार मिरवणूक,६८ लिंगांना आज तैलाभिषेक

सिद्धेश्वर यात्रा : नंदीध्वजांची निघणार मिरवणूक,६८ लिंगांना आज तैलाभिषेक

googlenewsNext
ठळक मुद्दे६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून निघणार मिरवणूकग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस प्रारंभ


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस उद्या शुक्रवार दि. १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, ‘श्री’नी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून निघणार आहे.
ही मिरवणूक हिरेहब्बू वाड्यातून निघाल्यानंतर बाबा कादरी मशीद, दाते गणपती, राजवाडे चौक, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टामार्गे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात येणार आहे. तेथे अमृतलिंगास तैलाभिषेक झाल्यानंतर मानकºयांना हिरेहब्बूंच्या हस्ते मानाचे विडे देण्यात येतील. त्यानंतर ‘श्री’च्या मूर्तीला तैलाभिषेक घालून मिरवणूक इतर लिंगांना तैलाभिषेकसाठी निघणार आहे. रात्री मिरवणूक पुन्हा हिरेहब्बू वाड्यावर परतेल.

Web Title: Siddheshwar Yatra: Nandvandhagaj's outer procession, 68 Lingas today, Thilabhishak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.