श्रीशैलमच्या रथोत्सवात सोलापूरचा नंदीध्वज अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:19 PM2019-04-10T14:19:50+5:302019-04-10T14:22:44+5:30

महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही श्रीशैलमच्या रथोत्सवात सहभाग, गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात.

Shrishailam rathotsav on the front of the flag of Solapur | श्रीशैलमच्या रथोत्सवात सोलापूरचा नंदीध्वज अग्रस्थानी

श्रीशैलमच्या रथोत्सवात सोलापूरचा नंदीध्वज अग्रस्थानी

googlenewsNext
ठळक मुद्देदीडशे सोलापूरकर युवक सहभागी : पाताळगंगेतील स्नानानंतर सुरू झाला अनुपम्य सोहळाश्रीशैलम रथोत्सवात सहभागी होण्याची सोलापूरकरांची परंपरा ही आजचीच नाही तर त्याला सिद्धरामेश्वरांपासूनची आख्यायिका लाभलेली आहेगुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कर्नाटक अन् सोलापूरचे भक्तगण़..वाद्यांचा दणदणाट.. उगादी(पाडवा)निमित्त निघालेल्या रथोत्सवात लाखोंची गर्दी़..महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही सहभाग़..श्रीशैल मल्लिकार्जुनचा जयजयकार करीत सोलापूरचा २८ फुटी नंदीध्वज अग्रभागी ठेवून सात किलोमीटर फिरविण्यात आला़ नंदीध्वजाची ही झळाळी, पूजेचा मिळणारा मान यातून जीवन सार्थकी लागल्याच्या भावना व्यक्त होताहेत.

हा नेत्रदीपक सोहळा श्रीशैलम येथे गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडला़ या सोहळ्यात सोलापूरमधील युवकांसह जवळपास १५० जणांनी सहभाग नोंदविला़ आंध्रमधील रेड्डी समाजाच्या दृष्टीने उगादी हा सण जणू दिवाळीच़ या सणात प्रथम पूजेचा मान हा सोलापूरकरांना मिळाला आहे़ सोलापूरमधील भक्तगण श्रीशैल गाठत असताना वाटेत अनेक गावांमधून भक्तगण कावड व पालखी घेऊन सहभागी होतात़ आंध्रमध्ये प्रवेश करताच ८० किमी अंतरात ७ डोंगर लागतात़ भीमनकोळा डोंगरावर भक्तगण हे मुंगीएवढे निदर्शनास येतात़ जंगलातून प्रवास होताना क रनूर - आलमपूरदरम्यान जंगलात  भक्तांना मुक्काम ठोकावा लागतो़ या भागात वनविभाग, काही सामाजिक कार्यकर्ते भक्तगण दाखल होण्यापूर्वीच वन्यजीव प्राण्यांचा वावर होऊ नये याची खबरदारी घेतात़ भक्तगण सोबत दोन ट्रक धान्य व साहित्य आणलेले असते़ सामूहिक स्वयंपाक करुन भूक भागवली जाते़ 

अमावस्येच्या दिवशी रात्री १२ वाजता श्रीशैल मल्लिकार्जुनला रुद्राभिषेक, विधीपूजा पार पाडली जाते़ दिवसभरात मल्लिकार्जुन यांच्या लिंगास सोन्याच्या नागफणाने सजवितात़ सिद्धेश्वर यात्रेतील करमुटगीच्या पार्श्वभूमीवर पाताळगंगेत गंगास्नान घातले जाते़ अन् सायंकाळी रथोत्सव सुरु होतो़ हा रथोत्सव डोळ्याचे पारणे फे डतो़ या उत्सवात सर्वात अग्रभागी सोलापूरचा नंदीध्वज असतो़ त्यामागे कावडी, पालखी आणि त्यामागे मल्लिकार्जुन आणि भ्रमरांबिका मातेची मूर्ती असते़ या ठिकाणी दोन दिवस नंदीध्वजाचा विसावा असतो़ 

रथोत्सवाच्या ओढीने चालतात ६०० कि़मी़ अंतर 
- श्रीशैलम रथोत्सवात सहभागी होण्याची सोलापूरकरांची परंपरा ही आजचीच नाही तर त्याला सिद्धरामेश्वरांपासूनची आख्यायिका लाभलेली आहे़ महाशिवरात्रीनंतर सोलापूरमधून जवळपास शंभर भक्तगणांचा एक गट येथून निघतो़ गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात़ हे सारे श्रीशैलमध्ये जमतात़ दरम्यान, गुढीपाडव्याला दहा दिवसांचा अवधी असताना सोलापूरमधून युवकांचा एक गट वाहनाने निघतो़ सोबत नंदीध्वज घेऊन निघतात आणि आडकेश्वर येथे सारे एकत्रित येतात़ 

मंदिराच्या पुजाºयांनी पेलला नंदीध्वज 
- आध्यात्मिक वातावरणात निघालेला रथोत्सव हा मंदिर परिसरापासून सात किलोमीटर चालतो. या रथोत्सवात सोलापूरचाही नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून जवळपास ७ किलोमीटर चालवला जातो़ बाराबंदीतील येथील युवक तेथे लक्ष वेधून घेतात़ सिद्धेश्वर सेवा संघाचे सागर बिराजदार, शैलेश वाडकर, श्रीशैल कोळी, शंकर बंडगर,भीमाशंकर झुरळे, स्वप्निल हुंडेकरी, गणेश कोरे, सोमा औजे, काशिनाथ हावळगी, कल्याणी बिराजदार आणि आनंद मंठाळे या युवकांनी नंदीध्वज पेलवून नेला़ याबरोबरच श्रीशैल देवस्थानचे पुजारी मधुशंकर यांनी २८ फु टी नंदीध्वज पेलून नेला़ तो पेलण्याचा आनंद त्यांच्या चेहºयावरुन ओसंडून वाहत होता़ 

Web Title: Shrishailam rathotsav on the front of the flag of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.