केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:11 PM2017-11-06T16:11:13+5:302017-11-06T16:13:23+5:30

तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे.

The new comprehensive policy of the central government will be announced in five days, Pasha Patel's Solapur information, the evening market opens at Solapur Market Committee | केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ

केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ

Next
ठळक मुद्देतूर,मूग,सोयाबीन,उडीद,हरभरा,भुईमूग पिकांना किमान आधारभूत किंमत  देशात सुमारे १४ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा कमी झाला  शेतकरी केंद्रबिंदू मानून व्यापारी त्याच्या मालाला चांगला भाव देतात रात्रीच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ तसेच आर. ओ. प्लांटचा लोकार्पणही करण्यात आला़



आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे.या धोरणानंतर देशातील शेतक-यांना माणूस म्हणून जगण्याची संधी  असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी सांगितले. 
      सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे आणि भाजीपाला या नियंत्रित शेतीमालाचा सायंकाळच्या लिलावाचा शुभारंभ सोमवारी बाजार समिती परिसरातील कांदा सेल हॉल येथे पटेल यांच्या हस्ते करण्यात आला , त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे माजी  संचालक ,शहाजी पवार, देशमुख,बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, प्रभारी सचिव विनोद पाटील,नानासाहेब देशमुख,रियाज बागवान,राजन जाधव,केदारनाथ उंबरजे,जगन्नाथ सिंदगी , प्रभुराज विभुते,महालिंगप्पा परमशेट्टी, ओसवाल,सिद्रामप्पा नरोणे,बाळू करवा,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
 पाशा पटेल म्हणाले,गडकरी,रामविलास पासवान आणि राधामोहन सिंग यांच्यासह विविध खात्याच्या सचिवांची  एकत्रित बैठक नुकतीच झाली आहे. त्या बैठकळीला आपण स्वत: उपस्थित होतो. तूर,मूग,उडीद,भुईमूग,सोयाबीन,हरभरा या पिकांचे देशातील एकूण उत्पादन किती,गरज किती,राज्य सरकारने दराबाबत केलेली शिफारस याचा ताळमेळ घालून केंद्र सरकार येत्या पाच दिवसात किमान आधारभूत किमतीबाबत आपले नवीन व्यापक धोरण जाहीर करणार आहे. सप्टेंबर महिन्यात तूर,मूग आणि उडीद यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. लवकरच  हरभरा आणि मसूर या डाळींवरीलही निर्यातबंदी उठणार आहे. गेल्या बारा वर्षात चुकलेली घडी दुरुस्त करणार आहोत.स्वातंत्र्यानंतर शेतक-यांसाठी असा पहिलाच हा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. 
     पीक काढणीनंतर व्यवस्था नसल्याने देशात शेतकरी आणि व्यापारी यांचे वषार्काठी सुमारे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. स्थापन करण्यात आली आहे. सहा महिने राज्यातील सर्व पिकांच्या ८० शेतकरी प्रतिनिधींबरोबर बोलून प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर कायदा होणार असून उत्पन्न दुप्पट होण्यासाठी या कायद्याचा उपयोग होणार असल्याचे पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
       देशात सुमारे १४ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे. मध्य प्रदेशात हा पेरा ७३ लाख हेक्टरवरून ५३ लाख हेक्टरवर आला आहे असेही त्यानीं सांगितले. 
  शेतकरी केंद्रबिंदू मानून व्यापारी त्याच्या मालाला चांगला भाव देतात. व्याप-यांना त्याचा हक्क आणि शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे .  पणनमंत्री सुभाष देशमुख आपल्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत. कोणाचाही व्यापार बुडावा आणि कोणाची गळचेपी होणार नाही असे सांगतानाच व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयात ११० पिटिशन दाखल केले असल्याचे शहाजी पवार यांनी सांगितले.  
       यानिमित्ताने पाशाभाई पटेल आणि मान्यवरांच्या हस्ते रात्रीच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ तसेच आर. ओ. प्लांटचा लोकार्पणही करण्यात आला़ याप्रसंगी एन.एम खलिफा, अप्पासाहेब उंबरजे,राईस बागवान , सिद्धाराम तंबाके,सादिक बागवान,महालिंग परमशेट्टी , दिनेश उपासे,नारायण माशाळकर , श्रीमंत बंडगर,मुश्ताक चौधरी,त्रिंबक मुसळे,एस,एम , पौळ ,शिवानंद दरेकर यांच्यासह याडार्तील व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले तर आभार प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी मानले.

Web Title: The new comprehensive policy of the central government will be announced in five days, Pasha Patel's Solapur information, the evening market opens at Solapur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.