दहावीच्या निकालात मोहोळ तालुका अव्वल

By appasaheb.patil | Published: June 8, 2019 02:11 PM2019-06-08T14:11:15+5:302019-06-08T14:13:05+5:30

सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८१.८३ टक्के लागला; यंदाही मुलींचीच बाजी

Mohall taluka tops in Class X results | दहावीच्या निकालात मोहोळ तालुका अव्वल

दहावीच्या निकालात मोहोळ तालुका अव्वल

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात सुमारे ६४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ७१६ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण मोहोळ तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ८६.४५ टक्के तर सर्वाधिक कमी निकाल अक्कलकोट तालुक्याचा (७३.०९) टक्के इतका लागला

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या वतीने मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा एकूण निकाल ८१.८३ टक्के लागला. सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मोहोळ तालुक्याने बाजी मारली आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. मोहोळ तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ८६.४५ टक्के तर सर्वाधिक कमी निकाल अक्कलकोट तालुक्याचा (७३.०९) टक्के इतका लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुमारे ६४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ७१६ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

- अक्कलकोट : ७३.०९ टक्के

- बार्शी : ८५.५१ टक्के

- करमाळा : ७८.०६ टक्के

- माढा : ८४.१५ टक्के

- माळशिरस : ७८.९१ टक्के

- मंगळवेढा : ८४.५१ टक्के

- मोहोळ : ८६.४५ टक्के

- पंढरपूर : ८१.५२ टक्के

- सोलापूर शहर : ८१.७३ टक्के

- सांगोला - ८४.७९ टक्के

- एकूण निकाल - ८१.८३ टक्के

Web Title: Mohall taluka tops in Class X results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.