सोलापूर बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर, आजपासून पाहण्यास उपलब्ध, नोंदविता येतील हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:07 PM2018-02-16T16:07:11+5:302018-02-16T16:08:03+5:30

दहा गुंठ्यांवर शेतजमीन असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे.

List of Solapur Market Committee's list, available for viewing from today, can be recorded | सोलापूर बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर, आजपासून पाहण्यास उपलब्ध, नोंदविता येतील हरकती

सोलापूर बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर, आजपासून पाहण्यास उपलब्ध, नोंदविता येतील हरकती

Next
ठळक मुद्देजिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर केली जिल्हा निवडणूक शाखा, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहा. निबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर यांच्या कार्यालयात पाहायला मिळेल२६ फेब्रुवारीपर्यंत हरकरती नोंदविता येतील. यावरील निकाल ८ मार्चपर्यंत जाहीर होणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : दहा गुंठ्यांवर शेतजमीन असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. शुक्रवारपासून ती जिल्हा निवडणूक शाखा, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहा. निबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर यांच्या कार्यालयात पाहायला मिळेल. २६ फेब्रुवारीपर्यंत हरकरती नोंदविता येतील. यावरील निकाल ८ मार्चपर्यंत जाहीर होणार आहे.
सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची निवडणूक मार्च महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. शासनाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यानुसार सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या मतदार याद्या महसूल प्रशासनाने तयार केल्या आहेत. १० गुंठ्यांवर शेतजमीन असलेल्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकºयांच्या नावाचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. सामायिक खात्यामध्ये केवळ पहिल्या क्रमांकाच्या शेतकºयाची नोंद घेण्यात आली आहे. सोलापूर बाजार समितीच्या १५ गणांमध्ये एकूण ८० हजार ९२८ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. व्यापारी मतदारसंघात १०६७ तर हमाल मतदारसंघात ११०५ मतदारांचा समावेश आहे. होटगी मतदारसंघात सर्वाधिक ७१०६ मतदारांचा समावेश आहे. बाळे गणात सर्वात कमी ३५८५ मतदार आहेत.
बार्शी बाजार समितीची प्रारूप मतदार यादी निवडणूक कार्यालयाने बाजार समितीकडे दिली आहे. ही यादी सोमवारी जाहीर होणार आहे. न्यायालयाने सर्वप्रथम बार्शी बाजार समितीची निवडणूक पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी १५ मार्चपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 
--------------------------
८० लाख रुपये खर्च अपेक्षित
- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ८० लाख रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज जिल्हा निवडणूक शाखेने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे वर्तविला आहे. बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही निवडणूक पारंपरिक मतपत्रिकेच्या आधारे होणार असल्याची शक्यता आहे. 
---------------------
गणाचे नाव आणि कंसात मतदार संख्या
- कळमण (४९३७), नान्नज (३९५७), पाकणी (४०२८), मार्डी (४७५३), बोरामणी (६७१२), बाळे (३५८५), हिरज (४०८१), कुंभारी (५२७१), मुस्ती (६३५०), होटगी (७१०६), कणबस (४९३९), मंद्रुप (६३४५), कंदलगाव (६८०७), भंडारकवठे (६०९७), औराद (५९३६). इतर मतदारसंघ : हमाल तोलार : ११०५, व्यापारी ११६७. 

Web Title: List of Solapur Market Committee's list, available for viewing from today, can be recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.