सोलापूरात अवकाळी पावसाची हजेरी

By admin | Published: April 28, 2017 05:37 PM2017-04-28T17:37:48+5:302017-04-28T17:37:48+5:30

-

Light rain in Solapur | सोलापूरात अवकाळी पावसाची हजेरी

सोलापूरात अवकाळी पावसाची हजेरी

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली़ सुरूवातीला हलक्या सरीने सुरूवात झालेल्या पावसाने शहरातील काही भागाला चांगलेच झोडपून काढले़
दरम्यान, शुक्रवारी सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे, चौपाड, नवीपेठ, बाळीवेस, जोडबसवण्णा चौक, दमाणी नगर, महापालिका, सरस्वती चौक, जिल्हा परिषद परिसर, अवंती नगर, शासकीय रूग्णालय,आसरा चौक आदी परिसरात पावसाने हजेरी लावली़ शहरातील काही ठिकाणी उन्ह पावसाचा खेळ सुरूच होता तर काही ठिकाणी कडक उन्ह दिसून येत होते़
या पावसामुळे पुना नाका परिसरातील चिमुकल्यांनी आनंद साजरा करीत डान्स केला़ तर अचानक सुरू झालेल्या पावसाने शहरातील नागरिकांचे धावपळ झाली़
---------------
शहर परिसरातही पाऊस
शहरासह परिसरातील वळसंग, शेळगी, इंगळगी, बाळे परिसरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली़ अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली़

Web Title: Light rain in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.