लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या, सोलापूरच्या महिला काँग्रेस कमिटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:33 PM2017-10-31T16:33:19+5:302017-10-31T16:37:03+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना निवेदन देण्यात आले़

Give 33 percent reservation to women in Lok Sabha, Vidhan Sabha elections; Women Congress Committee of Solapur demands | लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या, सोलापूरच्या महिला काँग्रेस कमिटीची मागणी

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या, सोलापूरच्या महिला काँग्रेस कमिटीची मागणी

Next
ठळक मुद्देपुरूषप्रधान संस्कृतीमुळे काही ठिकाणी महिलांना डावलले जातेहिवाळी अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासंबंधी ठराव करून आरक्षण देण्यात यावे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३१ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील, निरीक्षक डॉ़ स्मिता शहापूरकर, प्रदेश सरचिटणीस सुनेत्राताई पवार, प्रदेश चिटणीस सुमन जाधव आदी उपस्थित होते़
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा चांगला निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहनसिंग यांनी घेतला आहे़ पुरूषप्रधान संस्कृतीमुळे काही ठिकाणी महिलांना डावलले जाते असे न होता पुरूषाप्रमाणे महिलांनाही समान हक्क मिळावा, यापुर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिला ३३ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी सह्यांची मोहिम राबवून वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहेत़ मात्र कोणताही निर्णय झाला नाही़ तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरीत हिवाळी अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासंबंधी ठराव करून आरक्षण देण्यात यावे याबाबतीचे निवेदन देण्यात आले़ 
यावेळी करीमुन्नीसा बागवान, माजी नगरसेविका आशा म्हेत्रे, अश्विनी जाधव, भारती इप्पनपल्ली, प्रमिलाताई तुपलवंडे, शोभा बोंबे, वंदन पंत, राजश्री लोलगे, शबाना बागवान, संध्या काळे, भारती देशमाने, कमल चव्हाण, लक्ष्मी सोनकांबळे, मिना लोके, वैशाली गवई, रतन डोळसे, रेणुका मंजुळकर, स्वाती दाते, शिल्पा चांदणे, मुमताज तांबोळी, महेरूनिस्सा विजापूर, रूक्साना शेख, कविता निंबाळकर, सुरेखा कसबे, पद्मा मोहिते, आयेशा शेख, सलीमा मुल्ला, अनारकली शेख, कलावती हिरापुरे, निर्मला पुजारी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते़

Web Title: Give 33 percent reservation to women in Lok Sabha, Vidhan Sabha elections; Women Congress Committee of Solapur demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.