चौदा वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये सापडला; प्रेमाने विचारल्यावर घरचा पत्ता सांगितला

By रूपेश हेळवे | Published: September 8, 2023 05:38 PM2023-09-08T17:38:48+5:302023-09-08T17:38:53+5:30

सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील यांनी बालकांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून कुमार यादव आणि कॉन्स्टेबल दादा नवगिरे यांनी त्या मुलास बालसुधारगृहाच्या स्वाधीन केले.

Fourteen-year-old boy found on train; When asked, Prema gave the address of the house | चौदा वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये सापडला; प्रेमाने विचारल्यावर घरचा पत्ता सांगितला

चौदा वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये सापडला; प्रेमाने विचारल्यावर घरचा पत्ता सांगितला

googlenewsNext

सोलापूर : चौदा वर्षांचा मुलगा ट्रेनमध्ये बसून प्रवास करीत असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पेालिसांनी तत्काळ रेल्वेच्या डब्यात तपासणी करून त्या अल्पवयीन मुलास आरपीएफ जवानांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्या मुलाची विचारपूस करून संबंधित मुलाच्या पालकास बोलावून घेतले. त्यानंतर जवानांनी त्या मुलास पालकाच्या स्वाधीन केले.

याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधील बी ६ क्रमांकाच्या डब्यात अल्पवयीन मुलगा प्रवास करीत असल्याची आरपीएफ पोलिसांना मिळाली. तातडीने आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल हनुमंत पाटोळे हे एक्सप्रेसमध्ये हजर झाले. त्यावेळी त्यांना एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलास आरपीएफ चौकीत आणले. तेथे त्या मुलास विचारपूस केल्यावर त्याने नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक एम.ए. खान यांनी मुलाच्या वडिलांना फोनवरून संपर्क साधून मुलांबद्दलची माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील यांनी बालकांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून कुमार यादव आणि कॉन्स्टेबल दादा नवगिरे यांनी त्या मुलास बालसुधारगृहाच्या स्वाधीन केले.

Web Title: Fourteen-year-old boy found on train; When asked, Prema gave the address of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.