दाढीतून वाचवलेल्या पैशानं दिलं कुष्ठरोगींना भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:44 PM2018-12-07T14:44:23+5:302018-12-07T14:47:12+5:30

रॉबिन हूड आर्मीचा उपक्रम; सोशल मीडियावरील आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Food for the leprosy given by the bearded birds | दाढीतून वाचवलेल्या पैशानं दिलं कुष्ठरोगींना भोजन

दाढीतून वाचवलेल्या पैशानं दिलं कुष्ठरोगींना भोजन

Next
ठळक मुद्देरॉबीन हूड आर्मी या संस्थेने माणुसकीची भिंत या उपक्रमातून आणखी एक अनोखा उपक्रम राबवलाअमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता वाचवलेल्या पैशातून कॅन्सरग्रस्तांना मदत केली दाढी न करता जमवलेल्या पैशातून १०० कुष्ठरोगी अन् वंचित घटकातील बांधवांना भोजन

सोलापूर: सामाजिक काम करण्यासाठी कोणतीही सीमा नसते. रॉबीन हूड आर्मी या संस्थेने माणुसकीची भिंत या उपक्रमातून आणखी एक अनोखा उपक्रम राबवलाय. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता वाचवलेल्या पैशातून कॅन्सरग्रस्तांना मदत केली जाते हीच थीम सोलापुरातही राबवली.  दाढी न करता जमवलेल्या पैशातून १०० कुष्ठरोगी अन् वंचित घटकातील बांधवांना भोजन दिलं. लेप्रसी कॉलनीत हा उपक्रम राबवला.

त्याचं असं झालं, रॉबिन हूड संस्थेशी निगडित असलेल्या प्रशांत भूषण यांना एक कल्पना सुचली. अमेरिकेतील तरुणाईच्या धर्तीवर दाढी न करता त्यातून जमवलेले पैसे सामाजिक कामासाठी वापरावेत. त्यांनी ही कल्पना प्रा. हिंदुराव गोरे शेअर केली अन् तिला मूर्त आलं. सोलापुरातील लेप्रशी कॉलनीतील कुष्ठरोग्यांना एक दिवसाचे भोजन द्यायचं ठरलं. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी हा निर्णय झाला. लागलीच सोशल मीडियावरून यासाठी आवाहन केलं अन् चक्क ३० तरुणांनी स्वत:हून संपर्क साधला आणि या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. 

नोव्हेंबर महिना संपला. प्रत्येकाने आपल्या दाढी अन् कटिंगसाठीचा जो खर्च वाचवला तो संस्थेकडे जमा केला. कुणाचे १००, कुणाचे १५०, २०० असं करीत ही रक्कम ३ हजारांवर जमली. मग काय, या उपक्रमात सहभागी झालेली तरुणाई आणि रॉबिन हूडच्या सहकाºयांनी लेप्रशी कॉलनी गाठली. या कॉलनीतील ७० जण आजूबाजूची अन्य अशा १०० गरजू, वंचितांना एक दिवसाचं सुग्रास भोजन दिलं. प्रत्येकाच्या चेहºयावरचा तो   आनंद अन् डोळ्यातील तो कृतज्ञ भाव या कार्यकर्त्यांना ऊर्मी देणारा  ठरला. या उत्साहानं तरुणाईही भारावून गेलीय. 

व्हीव्हीपी कॉलेजचे प्रा. अनिल अवधूत व एसव्हीआयटी कॉलेजचे प्रा. प्रशांत मुशन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कुष्ठरोग्यांशी भोजन देण्याचा उपक्रम पार पडला. सौरभ क्षीरसागर, प्रा. अनिकेत चनशेट्टी, नरेश मलपेद्दी, मल्लिनाथ शेट्टी, प्रतीक पुकाळे, आकाश मुस्तारे, आदित्य बालगावकर, स्वामीराज बाबर, अमोल गुंड, समर्थ उबाळे, स्वप्निल गुलेद, प्रेम भोगडे, दिनेश मुशन या तरुणाईनं यासाठी योगदन दिले. 

वंचित घटकांसाठी कार्याची व्याप्ती वाढवणार
- समाजामध्ये वंचित घटकातील लोकांना आपलंसं करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती समाजामध्ये वाढीस लागण्याची गरज आहे. शहरात अनेक संस्था आपापल्या परीनं ते काम करतायत. आम्हीही अशा उपक्रमाची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्धार केलाय. तरुणाई अशा अनोख्या उपक्रमासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असते. फक्त त्यांना दिशा देण्याची अन् एकत्र करण्याची गरज आहे. ती आम्ही यापुढे नेटाने करणार असल्याचा मनोदय या परिवाराचे प्रमुख प्रा. हिंदुराव गोरे यांनी व्यक्त केला. 

Web Title: Food for the leprosy given by the bearded birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.