मारहाण चेहºयावर.. वार मांडीवर; अनैतिक संबंधातून खुनाची शक्यता, सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:16 PM2018-12-29T12:16:22+5:302018-12-29T12:17:41+5:30

सोलापूर : आसरा चौक परिसरात शुक्रवारी रात्री खून झालेल्या तरुणाच्या चेहºयावर मारहाणीचे व्रण आढळले असले तरी शस्त्राचे वार मात्र ...

At the face of the assault .. on the knees; The possibility of murder through immoral relations, the incident in Solapur | मारहाण चेहºयावर.. वार मांडीवर; अनैतिक संबंधातून खुनाची शक्यता, सोलापुरातील घटना

मारहाण चेहºयावर.. वार मांडीवर; अनैतिक संबंधातून खुनाची शक्यता, सोलापुरातील घटना

Next
ठळक मुद्देआसरा चौक परिसरात शुक्रवारी रात्री खून झालेल्या तरुणाच्या चेहºयावर मारहाणीचे व्रणकेवळ मांड्यांमध्येच असल्याने अनैतिक संबंधातून खून झाल्याची शक्यतापोलिसांकडून संबंधित घटनेबद्दल अकस्मात मयत असे सांगण्यात येत आहे

सोलापूर : आसरा चौक परिसरात शुक्रवारी रात्री खून झालेल्या तरुणाच्या चेहºयावर मारहाणीचे व्रण आढळले असले तरी शस्त्राचे वार मात्र केवळ मांड्यांमध्येच असल्याने अनैतिक संबंधातून खून झाल्याची शक्यता घटनास्थळी वर्तविली गेली.

दरम्यान, खून झालेल्या तरुणाची पोलिसांकडून तपासणी करताना त्याच्या पँटच्या खिशात १०० रुपये आढळून आले. प्रेताच्या शेजारीच त्याच्या चपला दोन्ही दिशेने पडल्याचे दिसून आले. तरुणाच्या गुप्तांगावरील वार पाहून हा प्रकार अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात बघ्यांपैकी अनेकांकडून ऐकावयास मिळाली. पोलिसांकडून संबंधित घटनेबद्दल अकस्मात मयत असे सांगण्यात येत आहे.

त्याचा चेहरा धुळीने माखला होता. एक हात मोडलेला तसेच  जांघेत तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहिली तरी थेट पोलिसांना सांगण्यास कुणीही पुढे आले नाही. 

घटनेची खबर मिळताच पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा. पोलीस आयुक्त महावीर सकळे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला.

 पंचनाम्यानंतर तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला.  तसेच मातीतील रक्ताचे डागही पोलिसांनी हुडकून पंचनाम्यासाठी जप्त केले.

श्वान आले.. अन् घुटमळले
- घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. ते ज्या ठिकाणी तरुणाचा मृतदेह होता तेथे आले.. घुटमळले अन् परत फिरले. मातीच्या फुफाट्यामुळे रक्तही मातीत मिसळल्याने काही सापडले नाही. पोलिसांनी तपासणीसाठी माती, तरुणाच्या चपला ताब्यात घेतल्या आहेत.

Web Title: At the face of the assault .. on the knees; The possibility of murder through immoral relations, the incident in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.