सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांकडून कोणत्याच प्रकारची सक्तीची वसुली करू नका : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:21 PM2018-12-08T12:21:24+5:302018-12-08T12:23:45+5:30

६० हजार मजुरांना देणार काम : जिल्हाधिकारी

Do not make any compulsory recovery from the farmers of Solapur district: Collector | सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांकडून कोणत्याच प्रकारची सक्तीची वसुली करू नका : जिल्हाधिकारी

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांकडून कोणत्याच प्रकारची सक्तीची वसुली करू नका : जिल्हाधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळी मदतीसाठी शेतकºयांच्या याद्या तयारशासनाकडून मदत प्राप्त झाल्यानंतर त्यात दिरंगाई होणार नाहीदुष्काळासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

सोलापूर : केंद्र शासनाच्या पथकाने दोन दिवस जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. जिल्ह्यात दुष्काळात ६० हजार मजुरांना काम देण्याचे नियोजन केले. शेतकºयांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नका, असे यंत्रणेला निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. ग्रामीण भागात तीन हजार रस्ते करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी पुन्हा दुष्काळाची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या पाच टँकर असून टँकर मंजुरीचे अधिकार प्रांत अधिकाºयांना दिले आहेत. नरेगाच्या कामावर येणाºया मजुरांची संख्या कमी आहे. पाणंद रस्ते १ ते २ किलोमीटरचे आहेत. ज्या गावाला आवश्यकता आहे. त्या ठिकाणी रस्ते करण्यात येणार असून सांगोल्यात त्या दृष्टीने पाहणी केल्याचे भोसले यांनी सांगितले. अतिक्रमण काढून रस्ते करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आहे. कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकून मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला १५ लाख रुपयांचा निधी आलेला आहे. ज्या ठिकाणी बागा आहेत त्या ठिकाणी शेततळे, विहिरीच्या कामांना गती देण्यात आली. 

फळबागा जगविण्यासाठी शेतकºयांनी टँकरची मागणी केली आहे. केंद्रीय पथकाने त्याची दखल घेतली असल्याचे ते म्हणाले. जमीन महसूल, वाढीव जमीन महसूल वसुली केली जाणार आहे. कर्जाची वसुली कोणत्याही सक्तीच्या मार्गाने केली जणार नाही.  एफआरपीच्या पैशामधून वसुली केली जाणार नाही.  शेतकºयांना केंद्र आणि राज्य शासन मदत करणार आहे. आम्ही फक्त वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला आहे. त्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय होईल.

शेतकºयांच्या याद्या तयार
दुष्काळी मदतीसाठी शेतकºयांच्या याद्या तयार केल्या आहेत. शासनाकडून मदत प्राप्त झाल्यानंतर त्यात दिरंगाई होणार नाही. ती रक्कम तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. दुष्काळासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले. गाळपेर जमिनीवर चारा लागवड करण्यासाठी शेतकºयांना बियाणे, खत वाटप करण्यात आहेत. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने सुट्टीच्या दिवशी शासकीय कार्यालये सुरु राहणार आहेत. लवकरच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नागरिकांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय दोन वाहने आणि पाच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Do not make any compulsory recovery from the farmers of Solapur district: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.