सोलापूरातील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:25 AM2018-02-01T11:25:44+5:302018-02-01T11:29:16+5:30

लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा समारोप बुधवारी ३१ जानेवारीला पार पडला.

The concluding ceremony of 'Shivaaputra Sambhaji' Mahanata of Solapur | सोलापूरातील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा समारोप

सोलापूरातील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा समारोप

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूरच्या विकासासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मंत्री सुभाष देशमुख नेहमीच आग्रही असतात : ओमप्रकाश शेटे लोकमंगलने नागरिकांना छत्रपतींचे चरित्र समजून घेण्याची संधी दिली : ना. सुभाष देशमुखमहानाट्याचे निर्माता व दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांचाही ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १  : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा समारोप बुधवारी ३१ जानेवारीला पार पडला.
या समारोपीय समारंभाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सोनवणे, आमदार मुरकुटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, नागपुरातील उद्योजक प्रशांत पवार, अमोल पाटील, शिशिर दिवटे, रोहन देशमुख, अमित देशमुख, इंद्रजित पवार, शहाजी पवार, सुधीर खरटमल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी लोकमंगलच्या या आयोजनाचे कौतुक केले. या आयोजनातून लोकमंगलची जनप्रबोधनासाठी असलेली धडपड दिसून येते. सोलापूरच्या विकासासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मंत्री सुभाष देशमुख नेहमीच आग्रही असतात, असेही ते म्हणाले.
राजा माने म्हणाले, ना. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वातील लोकमंगलने नागरिकांना छत्रपतींचे चरित्र समजून घेण्याची संधी दिली. त्यातून नव्या पिढीचे उत्तम प्रबोधन करून इतिहास मांडण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. आमदार शिवाजीराव नाईक यांनीही यावेळी समयोचित भाषण केले. 
यावेळी सर्व पाहुण्यांचा तलवार आणि भेटवस्तू देऊन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. महानाट्याचे निर्माता व दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांचाही ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या महानाट्यात सोलापुरातील १४५ कलावंतांचा सहभाग होता. त्यापैकी विघ्नेश कुंटम, सुचिता मदने, अभिजित भडंगे, मुक्ताई धाराशिवकर, ऐश्वर्या नंदूरकर, ओम पाटील या सहा कलावंतांचा प्रयोगाच्या मध्यंतरादरम्यान प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रयोगाचा हा अखेरचा दिवस होता. या सहा दिवसात तीन खासदार, २६ आमदार यांच्यासह ५५ मान्यवर पाहुण्यांनी या नाट्यप्रयोगाला उपस्थिती लावली. चंद्रग्रहणाचा दिवस असूनही प्रेक्षागारात अलोट गर्दी होती. 

Web Title: The concluding ceremony of 'Shivaaputra Sambhaji' Mahanata of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.