सोलापुरात वसुबारस साजरी; महापालिकेत महापौरांनी केले गो मातेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:53 PM2018-11-04T12:53:30+5:302018-11-04T12:55:36+5:30

आज वसुबारस भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाचा सण

Celebrating Vasubar in Solapur; Mayor made maternal worship in the Municipal Corporation | सोलापुरात वसुबारस साजरी; महापालिकेत महापौरांनी केले गो मातेचे पूजन

सोलापुरात वसुबारस साजरी; महापालिकेत महापौरांनी केले गो मातेचे पूजन

Next

सोलापूर : आज वसुबारस भारतीय संस्कृतीत निसर्गाच्या पूजनाने वेगवेगळ्या सणाच्या रूपाने केले जाते. यात पशु,पक्षी वृक्ष यांना मोठे महत्त्व आहे. वसुबारस हा त्याचाच एक भाग आहे. या दिवशी गाईंना सजवून त्यांची पूजा केली जाते. गाईला पुरणपोळी, दही भात व बाजरीत गुळ कालवून नैवेद्य दाखवले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आज महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते गो मातेचे पूजन करण्यात आले.

यावेळी महिला बालकल्याण सभापती रामेश्वर रामेश्वरी बिरू, नगरसेविका मेनका राठोड, राधिका पोसा, पुजारी नागराज शास्त्री रासकोंडा,डॉ.राजेंद्र गाजुल, राहुल नागमोते, भास्कर सामलेटी, सुरेश लिंगराज, विश्वनाथ काबणे, महादेव येळे, आदी मान्यवर उपस्थित होत.

Web Title: Celebrating Vasubar in Solapur; Mayor made maternal worship in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.