मोहोळ येथे बसपा नेत्याची पोलीसास धक्काबुक्की, कुरूलजवळील महावितरण कार्यालयाजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:52 PM2018-01-10T12:52:05+5:302018-01-10T12:52:23+5:30

अमर मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ, सध्या रा़ तडगावशेटी ग्रीनर्थिक हॉटेलसमोर बोराटेचाळ, पुणे), अविनाश मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ), हरि आप्पा क्षीरसागर (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ) या तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

BSP leader's policeman blows at Mohol, incident near Mahavitaran's office near Kurul | मोहोळ येथे बसपा नेत्याची पोलीसास धक्काबुक्की, कुरूलजवळील महावितरण कार्यालयाजवळील घटना

मोहोळ येथे बसपा नेत्याची पोलीसास धक्काबुक्की, कुरूलजवळील महावितरण कार्यालयाजवळील घटना

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : किरकोळ कारणावरून मोहोळ येथील बसपा नेत्याने पोलीसास धक्काबुक्की केल्याची घटना कुरूल रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर घडली़
याप्रकरणी अमर मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ, सध्या रा़ तडगावशेटी ग्रीनर्थिक हॉटेलसमोर बोराटेचाळ, पुणे), अविनाश मधुकर ससाणे (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ), हरि आप्पा क्षीरसागर (रा़ सिध्दार्थ नगर, मोहोळ) या तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पोलीस सब इन्सपेक्टर विष्णु साहेबराव गायकवाड (रा़ नेमणुक मोहोळ) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत मोहोळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कुरूलरोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर पोसई विष्णु गायकवाड हे उभारले असता कारमधून आलेले तिघांना अडविले़ त्यावेळी पोसई गायकवाड यांनी नाव विचारले असता सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली़ पुन्हा नाव विचारले असता त्यातील एकाने मी बहुजन समाज पार्टीचा नेता आहे मी काहीही करेन मला विचारणारे तुम्ही कोण असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून पोसई गायकवाड यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला़ याप्रकरणी पोसई विष्णु गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

Web Title: BSP leader's policeman blows at Mohol, incident near Mahavitaran's office near Kurul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.