सोलापुरात पद्मावत दोन ठिकाणी प्रसारित, अनुचित प्रकार घडला नाही, चित्रपटगृहांसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:13 PM2018-01-25T13:13:57+5:302018-01-25T13:21:23+5:30

बहुचर्चित चित्रपट पद्मावत बुधवारी शहरात मीना टॉकीज आणि बिग सिनेमा या दोन ठिकाणी प्रसारित झाला. गुरूवारी या चित्रपटास  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Broadcasting in two places in Padmavat, there was no untoward incident; | सोलापुरात पद्मावत दोन ठिकाणी प्रसारित, अनुचित प्रकार घडला नाही, चित्रपटगृहांसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त

सोलापुरात पद्मावत दोन ठिकाणी प्रसारित, अनुचित प्रकार घडला नाही, चित्रपटगृहांसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्दे सोलापूर शहरातील चित्रपटगृहांसमोर पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनातमीना टॉकीजमध्ये सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि त्यांची टीम, तसेच सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी आणि त्यांचे पथकविशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा बंदोबस्त साध्या वेशात


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर  दि २५ : बहुचर्चित चित्रपट पद्मावत बुधवारी शहरात मीना टॉकीज आणि बिग सिनेमा या दोन ठिकाणी प्रसारित झाला. गुरूवारी या चित्रपटास  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या चित्रपटास रजपूत समाज आणि हिंदू संघटनांचा विरोध असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या सोलापूर शहरातील चित्रपटगृहांसमोर पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे़  
कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले. शहरात मीना टॉकीज (ईस्क्वेअर) आणि बिग सिनेमा या दोन टॉकीजमध्ये बुधवारी पद्मावत चित्रपट प्रसारित होणार असल्याने सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी  पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.  सहायक पोलीस आयुक्तपरशुराम पाटील,सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक शहाजी पवार , पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. गायकवाड, सपोनि रोहित दिवसे, सपोनि श्रीशेल आवारे, सपोनि शेख, पोलीस उपनिरीक्षक मोटे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक डोके याशिवाय सुमारे १०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
-------------------
गुन्हे शाखेचा बंदोबस्त
- मीना टॉकीजमध्ये सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि त्यांची टीम, तसेच सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी आणि त्यांचे पथक होते. बिग सिनेमा येथे सहायक पोलीस निरीक्षक रणजित माने यांचे पथक तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा बंदोबस्त साध्या वेशात होता.
पद्मावतला नागरिकांचा प्रतिसाद
- शहरात बुधवारी दोन चित्रपटगृहात पद्मावत चित्रपट प्रसारित झाला. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे तेथील चित्रपटगृहाच्या गर्दीवरुन लक्षात आले.

Web Title: Broadcasting in two places in Padmavat, there was no untoward incident;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.