दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती
By Appasaheb.patil | Published: March 15, 2023 04:44 PM2023-03-15T16:44:41+5:302023-03-15T16:47:15+5:30
दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते.
सोलापूर : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मागणीनुसार वाढीव वेतनावरील पेन्शनच्या अर्जाची तारीख वाढविण्यात आली आहे. आता अर्ज भरण्यासाठी ३ मे २०२३ ही अंतिम मुदत असणार आहे. सध्या वाढीव पेन्शनचा अर्ज भरण्यासाठी लोकांची ऑनलाइन सेंटरवर मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. २९ डिसेंबर २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकाव्दारे यासंदर्भातील सुचना क्षेत्रीय कार्यालयांना जारी करण्यात आल्या होत्या. १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या आणि त्यांच्या निवृत्तीपूर्वी संयुक्त पर्यायांचा वापर केलेल्या कर्मचर्यांना संयुक्त पर्यायांच्या प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाइन सुविधा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या संकेतस्थळावर ३ मार्च २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली हाेती. आता कर्मचारी, नियोक्त्ा संघटनांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी ३ मे २०२३ पर्यंत वाढविली आहे, अशी माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर कार्यालयाने दिली आहे. या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.