सख्खा भाऊच पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:25 AM2018-06-29T10:25:48+5:302018-06-29T10:26:03+5:30

घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

4 people murdered brutally in Solapur, over property dispute | सख्खा भाऊच पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू

सख्खा भाऊच पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू

googlenewsNext

सोलापूर  - सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याची घटना सोलापूरमधील बार्शी येथे घडली आहे.  घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील हा प्रकार आहे. दरम्याव, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश आहे. 

सुषमा देवकते, आर्यन देवकते, राहुल देवकते व कुटुंबातील एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. घर जागेच्या वादावरुन भाऊ रामचंद्र देवकते याने गुरुवारी (28 जून) रात्री भावाच्या घरातील लोक झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतलं व त्यांना पेटवलं. 
या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान अंत झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपी रामचंद्र हा देखील जखमी झाला आहे.

Web Title: 4 people murdered brutally in Solapur, over property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून