'चीकू' लापता है; सोशल मीडियावर पेट लव्हर व्यक्तीच्या पोस्टरने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:19 PM2024-01-08T13:19:31+5:302024-01-08T13:22:00+5:30

पाळीव मांजर हरवल्यानं मालकानं केली पोस्टरबाजी. 

Noida man giving reward of one lakh rupees for finding pet cat poster goes viral on social media  | 'चीकू' लापता है; सोशल मीडियावर पेट लव्हर व्यक्तीच्या पोस्टरने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष

'चीकू' लापता है; सोशल मीडियावर पेट लव्हर व्यक्तीच्या पोस्टरने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष

Viral News: घरामध्ये पाळीव प्राणी पाळण्याची अनेकांना आवड असते. हल्ली कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी सगळीकडेच पाहायला मिळतात. काही पेट लव्हर्स या प्राण्यांना अगदी घरातील सदस्यासारखी वागणूक देतात. पण सध्या सोशल मीडियावर एका पेट लव्हरने केलेल्या जाहिरातबाजीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

सध्या नोएडामध्ये एका हरवलेल्या मांजरीची जाहिरात पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आपली दीड वर्षाची मांजर हरवल्याने या मालकाने शहरात पोस्टर लावल्याचं पाहायला मिळत आहे.  नोएडाच्या सेक्टर ६२ मध्ये १४ दिवसांपूर्वी एक मांजर हरवली होती. या मांजरीच्या मालकाने आपली मांजर शोधून देणाऱ्याला चक्क १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची जाहिरात केलीय. मांजरीच्या मालकाने जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर, पॅम्पलेट लावल्याचं सांगण्यात येतंय. चीकू असं या हरवलेल्या मांजरीचं नाव आहे. जिंगर पार्शियन प्रजातीची ही मांजर हरवल्याने तिच्या मालकाने पोस्टर लावत मांजरीची संपूर्ण माहिती आणि त्याखाली १ लाख रुपयांचा इनाम देण्याचं जाहीर केलं आहे. 

नोएडा सेक्टर ६२ स्थित अजय कुमार यांनी पोलिस स्थानकात आपली मांजर हरवल्याची तक्रार देखील केली होती. परंतु मांजरीचा काही थांगपत्ता लागत नव्हता. अखेरचा पर्याय म्हणून अजय कुमार यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत तिथे देखील मांजर हरवल्याची पोस्ट केली. 

जीवापाड जपलेली चीकू अचानक हरवल्याने अजय यांचे कुटुंबीय चिंतीत असल्याचे ते सांगतात. पोलिसांत तक्रार, शिवाय सोशल मीडियावर पोस्ट करूनसुद्धा चीकू मिळत नसल्याने त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून १ लाखांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Noida man giving reward of one lakh rupees for finding pet cat poster goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.