व्हायरल झाला 'मिस्ट्री कपल'चा फोटा, सोशल मीडियात शोधमोहीम सुरु!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:08 PM2018-10-23T12:08:27+5:302018-10-23T12:15:36+5:30

सध्या इंटरनेटवरील शेकडो यूजर्स एका 'मिस्ट्री कपल'च्या शोधात लागले आहेत. कारण फार गंभीरही नाहीये आणि सामान्यही नाहीये.

Mystery couple picture goes viral thousands of users searching couple for photographer | व्हायरल झाला 'मिस्ट्री कपल'चा फोटा, सोशल मीडियात शोधमोहीम सुरु!

व्हायरल झाला 'मिस्ट्री कपल'चा फोटा, सोशल मीडियात शोधमोहीम सुरु!

Next

सोशल मीडियात अनेकदा वायफळ चर्चा सुरु असतात. पण काही वेळा काही गोष्टी मनाला आवडून जातात. सध्या इंटरनेटवरील शेकडो यूजर्स एका 'मिस्ट्री कपल'च्या शोधात लागले आहेत. कारण फार गंभीरही नाहीये आणि सामान्यही नाहीये. अमेरिकेतील एका फोटोग्राफरने दुरून एका कपलचा फोटो घेतला असून हा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोग्राफरला हे कपल कोण आहे हेही माहीत नाहीये. त्यामुळे फोटोग्राफरला या दोघांचा शोध घेत आहे आणि त्यात सोशल मीडिया यूजर्स त्याला मदत करत आहेत. 


महत्त्वाची बाब म्हणजे फेसबुक आणि ट्विटरवर यूजर्ज कपलचा फोटो आणि त्यांचा शोध घेण्याबाबत अपडेटही देत आहेत. अमेरिकन फोटोग्राफर मॅथ्यू डिप्पलने ६ ऑक्टोबरला कॅलिफोर्नियाच्या योसमाइट नॅशनल पार्कमध्ये हा फोटो काढला होता. 


डिप्पलने सांगितले की, 'मी टॉफ्ट पॉईंटचा खूप चांगला फोटो पाहिला होता. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्याची आणि फोटो काढण्याची खूप इच्छा होती. मी माझ्या मित्रासोबत सूर्यास्तावेळी तिथे गेलो. तेव्हा मी पाहिलं की, दूर डोंगराच्या एका टोकावर एका मुलगा ३५०० फूट उंचीवर एका मुलीला प्रपोज करतो आहे. मी दुरुन त्यांचा फोटो काढला'.



त्याने पुढे सांगितले की, 'मला वाटले ते सुद्धा फोटोग्राफी करत आहेत. पण तिथे कुणीच नव्हतं. नंतर या कपलला शोधण्यासाठी मी त्या पॉईंटवर गेलो, पण तिथे कुणीच नव्हतं. तिथे साधारण २० लोक होते. मी त्यांनाही विचारले पण त्यांनीही फोटोतील कुणाला पाहिले नव्हते'.

मॅथ्यूने १७ ऑक्टोबरला हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याने यूजर्सना अपील केलं की, यातील कपलला शोधण्यास मदत करा. आता यूजर्सही या कपलचा शोध घेत आहेत पण अजूनही त्यांचा शोध लागलेला नाहीये.

Web Title: Mystery couple picture goes viral thousands of users searching couple for photographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.