Video : पुरुषांला सोडून एका रजईसोबत लग्न करतीये ही बया, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:19 PM2019-01-23T16:19:53+5:302019-01-23T16:21:22+5:30

हिवाळ्यात कुणाचाही रजईशी जरा जास्त जिव्हाळा असतो हे काही वेगळं सांगायला नको. कारण कुडकुडणाऱ्या थंडीत रजईने मोठा दिलासा मिळतो.

The age of man devon's woman decided to marry with a duvet | Video : पुरुषांला सोडून एका रजईसोबत लग्न करतीये ही बया, जाणून घ्या कारण!

Video : पुरुषांला सोडून एका रजईसोबत लग्न करतीये ही बया, जाणून घ्या कारण!

Next

हिवाळ्यात कुणाचाही रजईशी जरा जास्त जिव्हाळा असतो हे काही वेगळं सांगायला नको. कारण कुडकुडणाऱ्या थंडीत रजईने मोठा दिलासा मिळतो. पण हा जिव्हाळ्याचा अतिरेक म्हणावा अशी एक घटना समोर आली आहे. एक महिला तिच्या रजईच्या इतकी प्रेमात पडली आहे की, ती रजईसोबतच लग्न करणार आहे. इतकेच काय तर या लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटल्या गेल्या आहेत.

रजईत काय खास?

४९ वर्षीय सेलिक ज्या रजईशी लग्न करणार आहे त्या रजईला जगभरात Duvet रजई म्हणून ओळखले जाते. याप्रकारच्या रजईमध्ये सिंथेटिक फायबर आणि फेदर असतं. 

रजईसोबत लग्न का?

सेलिक म्हणाली की, 'लोक जज करतील. पण असं कुणीच नाहीये जे रजईशिवाय राहू शकेल. माझ्या रजईसोबत माझं अनोखं रिलेशनशिप आहे. Duvet नेहमी माझ्यासोबत असते आणि मला जवळ घेते. माझं या रजईवर इतकं प्रेम आहे की, मला पाहुण्यांच्या उपस्थितीत या रजईसोबत लग्न करायचं आहे'. या लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्या असून येत्या १० फेब्रुवारीला डेवोन येथील ग्लोरियस आर्ट हाऊसमध्ये हे लग्न होणार आहे. 

लग्नासाठी ड्रेस कोड

या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. पाहुण्यांना गाउन, पायजामा आणि स्लीपर परिधान करुनच या लग्नाला यायचं आहे. जर पाहुण्यांना थंडी वाजली तर त्यांना सोबत एक टेडी बेअर आणि हॉट वॉटर बॉटल सोबत ठेवण्याची परवानगी आहे. 
या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काही लोकांना या महिलेचा रजईसोबत लग्न करण्याचा विचार चांगलाच पसंत आला आहे. 

Web Title: The age of man devon's woman decided to marry with a duvet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.