सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती मालवणला; समुद्रकिनारे हाऊसफुल, समुद्री खेळांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 03:47 PM2017-12-25T15:47:28+5:302017-12-25T15:54:26+5:30

सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं विविध पिकनिट डेस्टिनेशन्सकडे वळली.

Vacation for tourists; Bechas Housefull is the preferred choice of tourists to marine sports | सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती मालवणला; समुद्रकिनारे हाऊसफुल, समुद्री खेळांना प्राधान्य

सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पसंती मालवणला; समुद्रकिनारे हाऊसफुल, समुद्री खेळांना प्राधान्य

googlenewsNext

- महेश सरनाईक

सिंधुदुर्ग- सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं विविध पिकनिट डेस्टिनेशन्सकडे वळली. अनेक पर्यटकांनी सुट्टी घालविण्यासाठी कोकणाची निवड केली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले तीन दिवस हजारो पर्यटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले आहेत. सर्व बीच हाऊसफूल झाले असून पर्यटक समुद्राच्या लाटांवर स्वार होत सुट्टी एन्जॉय करत आहेत.
सिंधुदुर्गात सध्या जोरदार थंडी असून ओखी वादळाने थंडीचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे गुलाबी थंडी, सुट्टी आणि सगळीकडे पसरलेली गर्द हिरवी वनराई यामुळे सिंधुदुर्गातील वातावरण उल्हासवर्धक आहे. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे.
 
सिंधुदुर्गातील महत्वाचे बीच
मालवण शहरातील चिवला,  तारकर्ली, देवबाग, कोळंब, आचरा, तोंडवळी या मालवण तालुक्यातील मिठबाव, कुणकेश्वर, देवगड, विजयदुर्ग या देवगड किनारपट्टीवरील तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे, निवती, केळूस, खवणे, कोंडुरा, वेंगुर्ले बंदर, आरोंदा, वेळागर, शिरोडा, रेडी आदी महत्वाचे बीच पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक
पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आदी भागातून पर्यटकांच्या गाड्या भरून सिंधुदुर्गात दाखल झाल्या आहेत. दोन ते तिन दिवसांचा प्लान करून कुटुंबच्या कुटुंब कोकण पर्यटनाला आले आहेत.

बांगडा मच्छीवर ताव
मालवणी जेवणाची चव काही न्यारीच आहे. भात, मासे, कोकम कडी, घावणे, उसळ, आंबोळी, कोंबडी वडे आदीला पसंती आहेच, मात्र सर्वाधिक पसंती बांगडा, सुरमई, पापलेट, कोळंबीला मिळत आहे. मालवणी जेवणात मालवणमध्ये फेमस असलेल्या बांगड्याला प्रचंड मागणी आहे.

समुद्री क्रीडा प्रकारांना प्राधान्य
गोव्याप्रमाणे समुद्री खेळ आता सिंधुदुर्गातही सुरू झाल्याने तसेच स्कुबा डायव्हिंगमुळे समुद्र तळाशी खजिना पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
 

Web Title: Vacation for tourists; Bechas Housefull is the preferred choice of tourists to marine sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.