आंबोलीत पकडली अवैध दारू, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:15 IST2017-12-11T15:10:41+5:302017-12-11T15:15:16+5:30
आंबोली येथे गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली. या प्रकरणी कारचालक सागर राजू पाटील (रा. निपाणी) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २४,००० रुपये किमतीची दारू आणि कारसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आंबोलीत पकडली अवैध दारू, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
आंबोली : आंबोली येथे गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली. या प्रकरणी कारचालक सागर राजू पाटील (रा. निपाणी) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २४,००० रुपये किमतीची दारू आणि कारसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास केली. सागर पाटील हा महादेवगड पॉर्इंटच्या रस्त्याने तपासणी नाक्याला चकवा देत पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी २४००० रुपयांची गोवा बनावटीची दारू व कारसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कारचालक सागर पाटील याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, गुरुदास तेली आदींनी केली.