सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

By admin | Published: July 14, 2017 10:54 PM2017-07-14T22:54:52+5:302017-07-14T22:54:52+5:30

सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

Sindhudurg rained down the rain | सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील संगीता प्रभाकर माळकर (वय ४०) ही महिला ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली. सकाळी ओढ्यावर कपडे धुण्यासाठी ती गेली होती. तिचा शोध सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.
कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे टॅ्रकवर माती कोसळल्याने वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. बिकानेर-कोइमतूर रेल्वे कणकवली रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस अधूनमधून पडत होता. तर काही ठिकाणी पाऊस आवश्यक त्या प्रमाणात पडत नसल्याने शेतकऱ्यांची लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, गुरुवारी रात्री पासून पावसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील मधुसुदन करंगुटकर यांच्या घरावर सागाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कसाल रेल्वे पुलाशेजारी, ओरोस राजधानी हॉटेल शेजारी झाड पडल्याने वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. तसेच रानबांबुली येथे रेल्वे पुलाजवळ झाड पडल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प झाली होती. अखेर ग्रामस्थांच्या सहाय्याने झाडे बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्षाने संबंधित यंत्रणेला झाड पडल्याची कल्पना देऊनही संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बोर्डवे रेल्वे ट्रॅकवर माती कोसळली, वाहतूक ठप्प
कोकण रेल्वे मार्गावर कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे रेल्वे ट्रॅकवर दुपारी १२ च्या दरम्यान माती कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, याच वेळेत मुंबईहून कोईमतूरला जाणारी बिकानेर-कोईमतूर एक्स्प्रेस कणकवली रेल्वे स्थानकात थांबविली होती. तर या घटनास्थळी तातडीने कोकण रेल्वेचे अभियंता व कर्मचारी दाखल होताच रेल्वे ट्रॅकवरील माती बाजूला करून दुपारी २.३० वाजता रेल्वेचा वाहतूक मार्ग मोकळा करण्यात आला.

Web Title: Sindhudurg rained down the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.