सततच्या पावसामुळे दरड कोसळली, भुईबावडा घाटमार्ग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 03:05 PM2018-07-14T15:05:46+5:302018-07-14T15:11:06+5:30

भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली आहे

Due to continuous rain, the rift broke, Bhubabavada Ghat Marg jam | सततच्या पावसामुळे दरड कोसळली, भुईबावडा घाटमार्ग ठप्प

सततच्या पावसामुळे दरड कोसळली, भुईबावडा घाटमार्ग ठप्प

Next

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गगनबावड्यापासून दीड किलोमीटरवर भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. 

भुईबावडा भागात दरड कोसळल्यानंतर सकाळी आठपर्यंत तीन तास वाहतूक ठप्प होती. येथील बांधकाम रस्ता कामगारांनी लहान दगड आणि माती बाजूला करुन छोट्या वाहनांना मार्ग खुला करुन दिला. त्यानंतर जेसीबी पोचल्यावर सकाळी 10 पासून दरड हटविण्यासाठी घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. दरडीच्या ढिगाऱ्यातील मोठे दगड हटविण्यात घाट परिसरात पडणाऱ्या पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्ग सुरळीत केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एक जेसीबी, ट्रॅक्टर सार्वजनिक बांधकामाचे कामगार दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवित आहेत.

Web Title: Due to continuous rain, the rift broke, Bhubabavada Ghat Marg jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.