भोगवे बीचची आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग'साठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 09:36 PM2018-03-29T21:36:08+5:302018-03-29T21:36:08+5:30

जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणार्‍या ऑस्कर दर्जाचे 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकन दिले जाते. या मानांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांगसुंदर बीचची निवड करण्यात आली आहे.

Bhoge Beach Interiors recommend for 'Blue Flag' | भोगवे बीचची आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग'साठी शिफारस

भोगवे बीचची आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग'साठी शिफारस

Next

सिंधुदुर्ग - जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणार्‍या ऑस्कर दर्जाचे 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकन दिले जाते. या मानांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांगसुंदर बीचची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव सर्वांगसुंदर बीच म्हणून सिंधुदुर्गातील भोगवे या बीचची निवड करण्यात आली आहे. समुद्री पाण्याचा दर्जा, कि नार्‍यावरील स्वच्छता, सोयीस्कर संपर्क, पर्यटक सुरक्षितता, पर्यावरण व्यवस्थापन व योग्य माहितीची देवाणघेवाण या सर्व निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली आहे. 'ब्ल्यू फ्लॅग' चे मानांकन देणारे 'फाऊंडेशन फॉर एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन' ही प्रमुख संस्था डेन्मार्क येथे आहे.

Web Title: Bhoge Beach Interiors recommend for 'Blue Flag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.