Sindhudurg: मार्लेत हत्तीच्या कळपाचा महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न, घाबरुन महिला पडली बेशुद्ध; सुदैवाने जीव वाचला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 27, 2024 01:20 PM2024-04-27T13:20:32+5:302024-04-27T13:26:26+5:30

दोडामार्ग : काजू बागेतून घरी परतणाऱ्या महिलांवर हत्तींच्या कळपाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरुन एक ...

A herd of elephants attacked in Morle Village in Dodamarg Sindhudurg, the woman fell unconscious in fear | Sindhudurg: मार्लेत हत्तीच्या कळपाचा महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न, घाबरुन महिला पडली बेशुद्ध; सुदैवाने जीव वाचला

Sindhudurg: मार्लेत हत्तीच्या कळपाचा महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न, घाबरुन महिला पडली बेशुद्ध; सुदैवाने जीव वाचला

दोडामार्ग : काजू बागेतून घरी परतणाऱ्या महिलांवर हत्तींच्या कळपाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरुन एक महिला बेशुद्ध पडली. पल्लवी भगवान गवस (वय-२८) असे तिचे नाव असून साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मोर्ले येथे काल, शुक्रवारी ही घटना घडली. 

मोर्ले केर परिसरात सद्या हत्तींचा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हत्ती आणखीनच आक्रमक झाले आहेत. लोकवस्तीत येण्याबरोबरच माणसांवर हल्ले चढवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी जातात. काल शुक्रवारी भाग्यश्री गवस व त्यांची जाऊ पल्लवी गवस या काजू बागेतून संध्याकाळी उशिरा घरी परतत होत्या. दरम्यान हत्तींच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्यात पल्लवी गवस या घाबरुन भीतीने बेशुद्ध पडल्या. त्यांना साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने याघटनेत जिवीतहानी टळली.

Web Title: A herd of elephants attacked in Morle Village in Dodamarg Sindhudurg, the woman fell unconscious in fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.