सेवागिरी कृषी प्रदर्शनाला शेतकºयांकडून अभूतपूर्व प्रतिसाद -राज्यभरातील शेतकºयांची प्रदर्शनाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:39 AM2017-12-19T00:39:09+5:302017-12-19T00:41:25+5:30

पुसेगाव : श्री सेवागिरी सेवागिरी यात्रेत आयोजित कृषी प्रदर्शनात पाणलोट, ठिबक सिंचन, साखळी सिमेंट बंधारे, शेतीविषयक आधुनिक माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, व्यापकता, उपयुक्तता, शेती मालावरील उद्योग प्रक्रिया आदी विषयांचे स्टॉल

 An unprecedented response from farmers to exhibition of farmers' services for servicing agricultural exhibition. | सेवागिरी कृषी प्रदर्शनाला शेतकºयांकडून अभूतपूर्व प्रतिसाद -राज्यभरातील शेतकºयांची प्रदर्शनाला भेट

सेवागिरी कृषी प्रदर्शनाला शेतकºयांकडून अभूतपूर्व प्रतिसाद -राज्यभरातील शेतकºयांची प्रदर्शनाला भेट

Next
ठळक मुद्देबळीराजाच्या भेटीला विज्ञान : सामूहिक शेती, शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री योजना, पॅकिंग व्यवस्थापन, युवक व महिलांनी शेतीकडे लक्ष केंद्रित करावेजलयुक्त शिवार अभियानचा स्टॉल तसेच शासकीय योजनांचे फलक लोकांना आकर्षित करत

पुसेगाव : श्री सेवागिरी सेवागिरी यात्रेत आयोजित कृषी प्रदर्शनात पाणलोट, ठिबक सिंचन, साखळी सिमेंट बंधारे, शेतीविषयक आधुनिक माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, व्यापकता, उपयुक्तता, शेती मालावरील उद्योग प्रक्रिया आदी विषयांचे स्टॉल उभारले आहेत. त्यांना राज्यभरातील लाखो शेतकºयांनी भेट देऊन पाहणी केली.लघुउद्योग शेतीसंबंधी शासकीय अनुदान असणाºया योजनांसह गृहिणींना उपयुक्त असणाºया विविध गृहोपयोगी नामांकित कंपन्यांची माहिती देणारे स्टॉल सहभागी झाले.

येथील यात्रा स्थळावरील मैदानावर श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्सो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात जिल्हा परिषद कृषी विभागमार्फत जिल्ह्यातील विविध गावांत केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा लेखाजोखा उपकरणांच्या माध्यमातून मांडला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून पाणलोटतील विकसित गावातील सिमेंट बंधारे, हरितगृह, शेततळी, पॅक हाऊस, शेडनेट हाऊस, शेततळी, डीसीसीटी, लूज बोल्डर तयार केले आहेत.

प्रगतशील शेतकºयांच्या फळे-फुले भाजीपाला उत्पादनाचे नमुने ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कटगुणचे नितीन गायकवाड यांचा पेरू, निरगुडी येथील अनिल सत्रे यांचे सीताफळ, कुडाळच्या रवींद्र श्ािंदे यांचा लाल कोबी, कान्हरवाडीच्या प्रवीण यलगर यांची ढोबळी मिरची, विठे येथील शेतकरी राजेंद्र देशमुख यांची वांगी, डिस्कळच्या नितीन माने यांची सुकेनी, उपळाई खुर्दच्या बाळासाहेब पाटील यांचे हनुमान फळ यासह विविध फळे, भाजीपाला ठेवण्यात आला आहे.

ट्रॅक्टर, सारा यंत्र, शेंगदाणा, ज्वारी, गहू, हरभरा, कडधान्य पेरणी यंत्र, मका सोलणी, बटाटा लागवड, भांगलण, पॉवर टेलर, कडबा कुट्टी, गवत कापणी यंत्र, स्प्रे पंप, रीपर, आले व बटाटा काढणी यंत्र, चेन ड्राईव्ह रोटावेटर, व्हिजेटेबल अँड प्रूट मल्टिकटर आदी आधुनिक कृषी अवजारे विक्रीसाठी आणली आहेत. नवीन तंत्रज्ञानाची शेतकरी पाहणी करून खरेदी अथवा बुकिंग करताना दिसत आहेत.
जिल्हा परिषदेच्या कृषी व जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात आलेला जलयुक्त शिवार अभियानचा स्टॉल तसेच शासकीय योजनांचे फलक लोकांना आकर्षित करत आहे.

राष्टÑीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप जनजागरण मोहिमेचा उभारलेला स्टॉल मार्गदर्शक ठरत आहे. राज्यातील शेतकरी व रोजगारच्या संधी शोधणारे युवक वर्ग प्रदर्शनात आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत आणि उत्पादन क्षमतेत वाढ होईल, याचा संदेश देणारे पुसेगाव येथील चंद्रशेखर क्षीरसागर यांचा श्री सेवागिरी इरिगेटरचा नेटा फेमचा स्टॉल शेतकºयांना आकर्षित करून घेत आहे. सामूहिक शेती, शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री योजना, पॅकिंग व्यवस्थापन, युवक व महिलांनी शेतीकडे लक्ष केंद्रित करावे, कोरडवाहू शेती, पॉलिहाऊस शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनासह शेतीतील आधुनिक शेती विकासासह विविध कंपन्यांनी बनविलेली नाविण्यपूर्ण उत्पादने, यंत्रे, अवजारे, बदलत्या आव्हानांनुसार विकसित कीटकनाशके, खते, बी-बियाणे, उद्योग प्रक्रिया, उपकरणे उत्पादन खर्च व नुकसान कमी करण्याबाबतचे नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनात उपलब्ध झाले आहे. महिला बचत गटांनी खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सौंदर्य प्रसाधने यांचे स्टॉल लावले होते. आणखी दोन दिवस प्रदर्शन खुले असल्याने शेतकºयांना मोठी संधी मिळणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना
या प्रदर्शनात २५० हून अधिक स्टॉल, शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना, प्रगतशील शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतीमाल आकर्षक फुले-फळे व आधुनिकतेचा बाज या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन बुधवार, दि. २० पर्यंत खुले असणार आहे, याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव व स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे यांनी केले आहे.

Web Title:  An unprecedented response from farmers to exhibition of farmers' services for servicing agricultural exhibition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.