अदालत वाड्यासमोर दोन राजेंची सायकलस्वारी--जागतिक बंधूदिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:52 PM2018-05-23T22:52:32+5:302018-05-23T22:52:32+5:30

शालेय जीवनात एक भाऊ दुसऱ्याला मदत करत असतो. भावावर आलेले संकट टाळण्यासाठी सिद्ध असलेले अनेक भाऊ आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन बंधूंमध्ये

Two King's Cycling in Court Halls - World Bundyon ... | अदालत वाड्यासमोर दोन राजेंची सायकलस्वारी--जागतिक बंधूदिन...

अदालत वाड्यासमोर दोन राजेंची सायकलस्वारी--जागतिक बंधूदिन...

Next
ठळक मुद्देआठवण; शिवेंद्रराजेंचा अभ्यास पूर्ण केला म्हणून उदयनराजेंना ओरडा

सागर गुजर ।
साातारा : शालेय जीवनात एक भाऊ दुसऱ्याला मदत करत असतो. भावावर आलेले संकट टाळण्यासाठी सिद्ध असलेले अनेक भाऊ आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन बंधूंमध्येही लहानपणी असेच सख्ख्य होते.

शिवेंद्रसिंहराजेंचा अभ्यास पूर्ण केला म्हणून खुद्द उदयनराजेंनाच आपल्या काकींचा ओरडा खावा लागला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनीच ही आठवण ‘ब्रदर्स डे’च्या निमित्ताने ‘लोकमत’शी शेअर केली.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन बंधूंमधील विलोभनीय नात्याबद्दल सातारकरांना कायमच उत्सुकता असते. राजकारणाच्या सारिपाटामुळे दोघांत कायमच युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत असली तरी सातारकरांच्या मनात मात्र या भावांबद्दल कायमच आदर असतो.

ऐतिहासिक अदालवाड्यात मोठे बंधू उदयनराजेंसोबत केलेली धम्माल शिवेंद्रसिंहराजेंच्या अजूनही स्मरणात आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. गप्पांच्या ओघात लहानपणीच्या आठवणींविषयी छेडले असता विलोभसपणे त्यांनी आपल्या आठवणी मांडल्या.

‘आम्ही पूर्वी अदालतवाड्यात राहायला होतो. मी साताºयातच शिकायला होतो. तेव्हा उदयनराजे पाचगणीत शिकत होते. माझं मराठी थोडं कच्च होतं, एकदा उदयनराजेंनीच माझा मराठीचा अभ्यास पूर्ण केला.

हा प्रकार आईसाहेबांच्या लक्षात आला. अक्षरातील बदल त्यांनी लगेच ताडला आणि ‘शिवेंद्रला अभ्यासात मदत करायची नाही,’ असे त्यांनी उदयनराजेंना सुनावले होते. उदयनराजेंचे कुटुंब जरी जलमंदिरमध्ये राहायला असले तरीही उन्हाळा व दिवाळीच्या सुटीत आम्ही सर्वजण अदालतवाड्यातच एकत्र येत असू. वाड्यात लाकडी तलवारी होत्या. या तलवारांनीच आम्ही सारे बच्चेकंपनी खेळायचो. क्रिकेट, पोहणे,विटीदांडू, सायकल चालवणे अशा खेळांमध्ये आम्ही धम्माल उडवून द्यायचो. पागेतील मुलेही आमच्यासोबत खेळायला असायची. दिवाळीत एकत्र येऊन किल्ला बनवायचा.

वाड्याच्या वरच्या बाजूला राहणाºया कुंभारवाड्यातून मातीचे सैन्य आणून ती किल्ल्यावर मांडायचो. तेव्हा पुण्यशील सुमित्राराजे भोसले (दोघांच्याही आज्जी) होत्या. त्यांना मुले एकत्र येत असल्याने खूप आनंद व्हायचा. त्या काळी सुट्यांमध्ये आजींकडून खूप काही शिकायला मिळायचं.’

याकूबचे सायकल दुकान
अदालतवाड्याच्या खालच्या बाजूला याकूबचं सायकल दुकान होतं. तिथं आठ आणे, रुपया दिला की भाडेतत्त्वावर सायकल मिळायची. अर्धा तास, तासभर ही सायकल चालवायला मिळायची. उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे आपल्या मित्रांसोबत अदालतवाड्याच्या समोरच्या रस्त्यांवर सुसाटपणे या सायकली दामटत असत.


 

Web Title: Two King's Cycling in Court Halls - World Bundyon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.