चिमुकल्यांना वृक्षसंवर्धनाचा ध्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:46 PM2019-05-19T19:46:22+5:302019-05-19T19:46:27+5:30

सागर चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पठाराच्या कुशीत वसलेल्या डोंगरदऱ्यातील प्राथमिक शाळेतील कुसुंबीमुºयाच्या चिमुकल्यांचे ...

Tigress for the tree! | चिमुकल्यांना वृक्षसंवर्धनाचा ध्यास!

चिमुकल्यांना वृक्षसंवर्धनाचा ध्यास!

googlenewsNext

सागर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पठाराच्या कुशीत वसलेल्या डोंगरदऱ्यातील प्राथमिक शाळेतील कुसुंबीमुºयाच्या चिमुकल्यांचे हात उन्हाची पर्वा न करता झाडांना पाणी घालण्यासाठी सरसावलेले असून, या चिमुकल्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला वृक्षसंवर्धनाचा ध्यास पर्यावरण संतुलनाच्या जनजागृतीसाठी आदर्श निर्माण करत आहे.
आयएसओ मानांकित कुसुंबीमुरा, ता. जावळी प्राथमिक शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग असून, या विद्यार्थ्यांकडून वनविभागाद्वारे गत पावसाळ्यात लावण्यात आलेल्या वृक्षांना गेल्या दोन महिन्यांपासून सातत्य ठेवत पाणी घालून संगोपन व संवर्धन केले जात आहे. शाळेपासून साधारण एक किलोमीटर अंतर परिसरात रस्त्याच्या बाजूला उंबर, काटेसावर, करंज, जांभूळ आदी प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केलेल्या रोपांना पाणी घालून त्यांना जगविण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असून, नित्यनियमित पाणी घालत ती रोपे जगविण्यासाठी प्रत्येकाने झाडे दत्तक घेतली आहेत.
सध्या शाळेला सुटी लागली असूनही काही विद्यार्थी नियमितपणे येऊन वृक्षांना पाणी घालतात. त्यानंतर सर्व बाटल्यांच्या झाकणाला छिद्र पाडून बाटलीत सुतळी सोडून त्या पूर्णपणे पाण्याने भरून झाडाच्या बुंध्यापाशी ठेवण्यात आल्या.

ओलावा टिकण्यासाठी बुंध्यांवर पाला
झाडांना ओलावा टिकून राहावा, यासाठी झाडांच्या बुंध्यांवर पालापाचोळा पसरविण्यात आला. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होत आहे. या प्रकारच्या पद्धतीने ठिबकपेक्षा जास्त काळ पाणी बाटलीत राहते.
सुटीत मुलांकडून झाडांना पणी
झाडांना जगविण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाकाऊपासून टिकाऊ उपक्रमांतर्गत शिक्षकांनी मेढा ते कुसुंबीमुरा मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थ्यांकडून साधारण पन्नास ते साठ प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या.

Web Title: Tigress for the tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.