कार झाडाला धडकल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 10:01 AM2018-04-29T10:01:48+5:302018-04-29T10:01:48+5:30

रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला.

Sub-divisional police officer wounded after being hit by a car tree | कार झाडाला धडकल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जखमी

कार झाडाला धडकल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी जखमी

Next

सातारा : रहिमतपूर येथे गस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीप (एमएच ११ एबी ३०८) झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालक ही जखमी झाला. कट्टे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात रहिमतपूर-औंध रस्त्यावर पिंपरी हद्दीत रविवारी पहाटे झाला. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कट्टे पहाटे साडेचारच्या सुमारास रहिमतपूर पोलीस ठाण्यास भेट देऊन औंधकडे निघाल्या होत्या. बेसावध असतानाच जीप झाडावर आदळली. त्यामुळे कट्टे यांच्या डोक्याला जास्त मार लागला. चालक पोलीस नाईक विक्रम शिंदे हेही जखमी झाले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Sub-divisional police officer wounded after being hit by a car tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.