सज्जनगडाजवळ एसटी ब्रेक फेल; २६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:36 AM2018-03-05T00:36:38+5:302018-03-05T00:36:38+5:30

 ST breaks failed with Sajjangad; 26 injured | सज्जनगडाजवळ एसटी ब्रेक फेल; २६ जखमी

सज्जनगडाजवळ एसटी ब्रेक फेल; २६ जखमी

googlenewsNext

एसटी विभागाकडून तत्काळ मदत : ठोसेघरच्या यात्रेहून परतताना दुर्घटना; जखमींमध्ये पाच बालकांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा / गोडोली : सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटानजीक राजापुरी फाटा येथे रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या कड्याला धडकली. यामध्ये सव्वीस प्रवासी जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराची एसटी (एमएच ७ सी ९०३३) ही रविवारी दुपारी जांभेहून साताºयाला येत होती. एसटी राजापुरी फाट्यावर आली असता ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. चालक नितीन घाटे यांनी प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याकडेच्या कठड्याला धडकवली.
या अपघातात गाडीतील सव्वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये तीन महिन्यांच्या मुलासह दहा बालके आणि नऊ महिलांसह पाच पुरुषांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, राजापुरी फाट्यावर एसटीचा वेग अचानक वाढला. ती रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊ लागली. चालक नितीन घाटे यांनी प्रसंगावधान राखत एसटी रस्त्याकडेच्या कड्याला धडकवून तिचा वेग नियंत्रणात आणला.
अपघातात वनिता दिनकर गायकवाड (वय ३७ रा. गडकर आळी, सातारा), नंदा प्रकाश जाधव (४०, रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा), कपिल रामधन राठोड (२५), सोनू कपिल राठोड (२०, दोघे रा. शिवलालनगर, ता. उमरखेड, सध्या रा. सातारा), राजन कृष्णा हन्नुरकर (६५), अनिता शाम हन्नुरकर (२२, रा. शाहूपुरी, सातारा), सानिका जगन्नाथ मोरे (१२, रा. क्षेत्रमाहुली), कल्पेश दिलीप चाळके (१३), नंदा दिलीप चाळके (३५), नितेश दिलीप चाळके (१०), किसन लक्ष्मण पवार (६५), साहिल विठ्ठल पवार, समृद्धी विठ्ठल पवार (सर्व रा. चाळकेवाडी, ता. सातारा), सुनील विठ्ठल लोहार (३९, रा. ठोसेघर, ता. सातारा), अंजना प्रकाश जाधव (१२, रा. आकाशवाणी केंद्र, सातारा), दिव्यांश सुहास गायकवाड (तीन महिने), रोशन प्रकाश गायकवाड (१५), अमर कोंडिबा कदम (१३), ईश्वरी शंकर कदम (५), प्रकाश किसन गायकवाड (४०), करण प्रकाश गायकवाड (१३), सोहम संतोष कदम (१०), आक्काताई शंकर गायकवाड (४०, सर्व रा. मंगळवार पेठ सातारा), वंदना रामचंद्र्र सपकाळ (३५), वेदांत रामचंद्र्र सपकाळ (९, दोघे रा. भैरोबा पायथा सातारा), जगाबाई शिवराम कदम (६०, रा. जांभे ता. सातारा).
जखमींना रुग्णवाहिका व एका खासगी कंपनीच्या गाडीतून उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातप्रकरणी बस चालक नितीन घाटे (रा. खोकडवाडी, कोडोली सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूहोते.

Web Title:  ST breaks failed with Sajjangad; 26 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.