राज्यमंत्री सदाभाऊंचं राजू शेट्टींना ओपन चॅलेंज, तारीख, वार अन् मैदान ठरवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:34 PM2019-07-11T12:34:13+5:302019-07-11T13:22:06+5:30

पुण्यातील या कार्यक्रमाची गोंधळसदृश्य परिस्थिती पहाता खोत यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी दिली जाईल.

Set the open challenge, date, time and field for Raju Shetty, Sadabhau khot appeal | राज्यमंत्री सदाभाऊंचं राजू शेट्टींना ओपन चॅलेंज, तारीख, वार अन् मैदान ठरवा

राज्यमंत्री सदाभाऊंचं राजू शेट्टींना ओपन चॅलेंज, तारीख, वार अन् मैदान ठरवा

Next
ठळक मुद्देपुण्यातील या कार्यक्रमाची गोंधळसदृश्य परिस्थिती पहाता खोत यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी दिली जाईल.माजी खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दोस्तीतील कुस्ती आता महाराष्ट्राला परिचीत झाली आहे. आपली लढाई बाजाबुणग्यांशी नसून त्यांनी तारीख, वार आणि मैदान ठरवावे.

सातारा - माजी खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दोस्तीतील कुस्ती आता महाराष्ट्राला परिचीत झाली आहे. सदाभाऊ खोत यांनी रयत शेतकरी संघटना काढून स्वाभीमानी शेतकरी संघटनेला आव्हान दिलंय. त्यामुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच वाद उफळतो. मंगळवारी पुणे येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यशाळेत बोलत असताना, शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंसमोर गोंधळ घातला. त्यामुळे काही काळी कार्यक्रम रखडला होता. 

पुण्यातील या कार्यक्रमाची गोंधळसदृश्य परिस्थिती पहाता खोत यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी दिली जाईल. “मी देखील चळवळीतून पुढे आलो आहे. मला शेतकऱ्यांच्या समस्या चांगल्या महिती आहेत.” असे म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चतुशृंगी पोलिसांनी पूजा झोळे, अजिंक्य नागटीळकर, सूरज पवार, सूरज पंडित, सौरभ बळवडे आदीना ताब्यातही घेतले होते. त्यानंतर, साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

आपली लढाई बाजाबुणग्यांशी नसून त्यांनी तारीख, वार आणि मैदान ठरवावे. मी दोनहात करायला तयार आहे. वास्तविक पाहता, त्यांनी लोकसभेला झालेला पराभव पचवावा, उगी कडक लक्ष्मी अंगात येऊन थयथयाट करण्यापेक्षा संघटनेची पडझड थांबवावी, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना लक्ष्य केलं. तसेच, मी जेथे जोत, तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून केला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत ते 49 जागा लढविण्याच्या वल्गना करत आहेत. पण, त्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असेही खोत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
 

 

Web Title: Set the open challenge, date, time and field for Raju Shetty, Sadabhau khot appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.