साताऱ्याचे पोलीस टोपीमुळं दिसणार नव्या रुबाबात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:48 PM2019-04-25T23:48:04+5:302019-04-25T23:48:09+5:30

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्या सत्तर वर्षांपासून पोलिसांच्या डोक्यात असलेली टोपी आता कायमची हद्दपार होणार ...

Satara police caps will appear in new flutter | साताऱ्याचे पोलीस टोपीमुळं दिसणार नव्या रुबाबात

साताऱ्याचे पोलीस टोपीमुळं दिसणार नव्या रुबाबात

googlenewsNext

दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गेल्या सत्तर वर्षांपासून पोलिसांच्या डोक्यात असलेली टोपी आता कायमची हद्दपार होणार असून, या टोपीऐवजी ‘बेसबॉल’ (पी कॅप) टोपीचा वापर पोलिसांकडून दैनंदिन कामकाजावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे साताºयाचे पोलीस लवकरच नव्या रुबाबात साताकरांना पाहावयास मिळणार आहेत.
ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये असलेल्या पोलिसांच्या खाकी वर्दीचा लूक गरजेनुसार आणि काळानुसार आता बदलू लागला आहे. उभी टोपी (फटिंग कॅप) पोलिसांच्या डोक्यात घट्ट बसत नव्हती. तसेच बंदोबस्तावेळी किंवा गाडीवरून जाताना अनेकदा टोपी उडून रस्त्यावर पडत असत. या प्रकारामुळे टोपी गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यातच सध्या पोलिसांना भर उन्हात ड्यूटी करावी लागते. त्यामुळे उभ्या टोपीने चेहºयाचे संरक्षणही होत नाही. परिणामी पोलिसांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते. या सर्व बाबींचा विचार वरिष्ठ पातळीवरून करण्यात आला आणि त्याची तत्काळ अंमलबजावणीही झाली.
ही नवी टोपी शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दैनंदिन कामकाज, बंदोबस्तासाठी या नव्या बेस बॉल प्रकारातील टोपीची डोक्यावरील पकड घट्ट असल्याने कर्तव्य पार पाडताना ती डोक्यातून पडण्याची शक्यता नसते.
तसेच या टोपीमुळे उन्हापासून चेहºयाचे संरक्षण होत असल्याने बेस बॉल प्रकारातील टोपीचा अतिरिक्त टोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. सध्या वापरात असलेल्या टोपीला फॅटिंग कॅप असे म्हटले
जाते. ही कॅप केवळ परेड
आणि इन्स्पेक्शनसाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतर दैनंदिन कामकाजासाठी ही बेसबॉल प्रकारातील नवी टोपी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या नव्या टोपीबद्दल सर्व पोलिसांना कुतूहल असून, ही टोपी डोक्यात एकदाची कधी घालतोय, याची उत्सुकता पोलिसांना लागली आहे. येत्या काही दिवसांत सातारा पोलिसांचा नवा रुबाब नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
कापड दुकानदारांची चांदी..
पोलिसांना दरवर्षी शासनाकडून दोन गणवेशासाठी पाच हजार रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये आता नव्या टोपीची भर पडली आहे. या नव्या टोपीला साधारण शंभर ते दीडशे रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक पोलिसांना दोन टोप्या घाव्या लागणार आहेत. त्यामुळे सहा हजार टोप्या तयार करण्यासाठी व्यापाºयांकडून चढाओढ सुरू झाली आहे.
पालघर जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू
पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना बेसबॉल कॅप घालण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सर्वात प्रथम पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ही नव्या ढंगातील, रुपातील टोपी घालण्याचा राज्यात दुसरा मान सातारा पोलिसांना मिळावा म्हणून जिल्हा पोलीस दलानेही पावले उचलली आहेत. टोप्या तयार करुन देण्यासाठी दुकानदारांकडे मागणी केली आहे.

 

 

Web Title: Satara police caps will appear in new flutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.