दारूसाठी पैसे मागतो म्हणून मावस भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:21 PM2017-09-24T16:21:54+5:302017-09-24T16:28:06+5:30

दारुसाठी पैसे मागून वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरुन  चिडून लोखंडी पाईपाने मारहाण करुन मावस भावाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना फलटणजवळील फरांदवाडी हद्दीत घडली. खून करुन आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. गणेश उर्फ भरत बाळासाहेब लिंबरकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

My brother's brother's blood | दारूसाठी पैसे मागतो म्हणून मावस भावाचा खून

दारूसाठी पैसे मागतो म्हणून मावस भावाचा खून

Next
ठळक मुद्देलोखंडी पाईपाने मारहाण , चौधरवाडीत खळबळ आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजरफलटणजवळील फरांदवाडी हद्दीत खळबळजनक घटना

फलटण (सातारा) : दारुसाठी पैसे मागून वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरुन  चिडून लोखंडी पाईपाने मारहाण करुन मावस भावाचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना फलटणजवळील फरांदवाडी हद्दीत घडली. खून करुन आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. गणेश उर्फ भरत बाळासाहेब लिंबरकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहीत अशी, गणेश उर्फ भरत लिंबरकर (वय २४) हा गणेश सोमनाथ निमगिरे (दोघे रा. नागेश्वर नगर, चौधरवाडी, ता. फलटण) याच्या वडापावच्या गाड्यावर कामाला आहे. दोघेही मावसभाऊ असून ते शेजारी शेजारीच राहतात. गणेश लिंबरकर हा गणेश निमगिरे याला दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागून त्रास देत होता.

या कारणावरुन चिडून निमगिरे याने लिंबरकर याला शनिवारी रात्री जिंती नाका येथून तांबमळा ते सातारा रस्त्यावरील फरांदवाडी हद्दीत नेले. तेथे रस्त्याकडेच्या खड्ड्यात त्याला पाडून लोखंडी पाईपने डोक्यास मारहाण केली. यामध्येच गणेश लिंबरकर याचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर गणेश निमगिरे स्वत: फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने घडल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन मृतदेह पाहिला. गणेशच्या आई-वडिलांना बोलावून मृतदेह दाखविला. डोक्यात गंभीर दुखापत होऊन मेंदू बाहेर आला होता. सुनंदा लिंबरकर यांनी फलटण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: My brother's brother's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.