‘कृष्णाकाठी’ गुंजणार पक्ष्यांचा किलबिलाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:25 PM2018-08-14T23:25:20+5:302018-08-14T23:25:28+5:30

'Krushnakathi' birds twisted bird! | ‘कृष्णाकाठी’ गुंजणार पक्ष्यांचा किलबिलाट!

‘कृष्णाकाठी’ गुंजणार पक्ष्यांचा किलबिलाट!

Next

कºहाड : कºहाडच्या कृष्णा-कोयना नदींचा संगम असलेल्या कृष्णा नदीकाठी पक्ष्यांचा अधिवास वाढावा, यासाठी पालिकेने नदीकाठच्या एक हजार मीटर अंतरावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत नवीन कृष्णा पूल ते कृष्णामाई मंदिर परिसरात पालिकेने नुकतीच बर्डचेरी, कडुलिंब आदींसह पांगारा जातीची सुमारे चारशे रोपांपैकी अडीचशे रोपे लावली आहेत. पालिकेच्या या वृक्षारोपणास आता कºहाडकर नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच नदीकाठी करण्यात आलेल्या वृक्षारोपणामुळे आता नदीकाठी पक्ष्यांचा किलबिलाट गुंजणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कृष्णामाई घाट सुशोभीकरणास एकूण ५.८० कोटी अनुदान पालिकेस देण्यात आले आहे. त्यातून कृष्णामाई घाट सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटाच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. कºहाडला लाभलेल्या कृष्णा-कोयना नदीकाठाचे सौंदर्य अबाधित राहावे. याठिकाणी स्वच्छता राहावी, या उद्देशाने कºहाड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा नदीपात्र स्वच्छतेची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. त्यास स्वच्छतादूतांसह कºहाडकर नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेंतर्गत कृष्णा नदीकाठावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसर ते नवीन कृष्णा पुलाच्या एक हजार मीटर अंतरापर्यंतचे पात्र स्वच्छ केले. त्यानंतर आता या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास वाढावा, यासाठी मोठ्या संख्येने वृक्षलागवड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी नदीकाठावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ ते कोयनेश्वर घाट परिसरात खड्डेही खोदण्यात आलेले आहेत.
या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लावण्यात येत आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शहरात चार हजार रोपे लावण्यात येणार आहेत. त्यापैंकी शहर व ईदगाह मैदान परिसरात दीड हजार रोपे लावण्यात आलेली आहेत.
सुशोभीकरणास ५.८० कोटींचे अनुदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कºहाड पालिकेस दिलेला निधी तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत एकूण ५.८० कोटी अनुदान पालिकेस प्राप्त झाले आहे. त्यामधून कृष्णामाई घाटालगत सभामंडप बांधणे, कपडे बदलण्यासाठी खोली बांधणे, हरितपट्टे विकसित करणे आदी कामे केली जाणार आहे. याप्रमाणे कृष्णामाई घाटचे सुशोभीकरणास शासनाकडूनही पुढाकार घेण्यात आलेला आहे.
नगरसेवक व नगरसेविकांचाही वृक्षारोपणास पुढाकार
कºहाड पालिकेतील सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्याकडून कºहाड शहरास ग्रीनसिटी करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. काहींनी तर स्वत:हून वृक्षारोपण करून रोपेही भेट दिली आहेत. सध्या शहरात तसेच ईदगाह मैदान परिसरात वृक्षारोपण मोहिमेत सर्वजण सहभाग घेत आहेत.

Web Title: 'Krushnakathi' birds twisted bird!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.