कऱ्हाडला कृष्णा नदीपात्रात वडार समाजबांधवांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:47 PM2019-03-12T12:47:08+5:302019-03-12T12:48:07+5:30

वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रातून बाहेर न येण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.

Karhad's movement of Wadi civil society in Krishna river basin | कऱ्हाडला कृष्णा नदीपात्रात वडार समाजबांधवांचे आंदोलन

कऱ्हाडला कृष्णा नदीपात्रात वडार समाजबांधवांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देकऱ्हाडला कृष्णा नदीपात्रात वडार समाजबांधवांचे आंदोलनप्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार निवेदने

कऱ्हाड : वडार समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नदीपात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत जलआंदोलन सुरू केले. वडार समाजाचे तीन कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन कृष्णा नदीपात्रात उतरले. प्रशासनाकडून मागन्या मान्य होईपर्यंत नदीपात्रातून बाहेर न येण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.

वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार निवेदने देऊनही शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे गुरूवारपासून कऱ्हाड  तहसीलदार कार्यालयासमोर दशरथ पवार यांच्यासह काकासाहेब चव्हाण, सूर्यकांत पवार, दिपक नलवडे, जयवंत पवार, प्रकाश पवार, दिपक जाधव, राजू चव्हाण, प्रसाद धोत्रे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आंदोलन पाच दिवस सुरू असूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांनी जलआंदोलन सुरू केले. दशरथ पवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडार समाजावर होत असणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी २०१७ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कऱ्हाड तहसीलदारांच्याकडे पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु कऱ्हाड तहसीलदार कार्यालयाने पाठपुराव्याशी असंबंधित लोकांना खाणपट्टा कब्जा देऊन उत्खनन सुरू केले आहे. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही नेमकी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्या मागणीनुसार नांदलापूर, केसे, पाडळी येथे ७ मार्च २०१५ च्या अनुषंगाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, दंडात्मक कारवाई रद्द व्हावी तसेच पाठपुराव्याशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी.

दरम्यान, आंदोलन सुरू असताना पोलीस तेथे आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून बाहेर येण्याची विनंती करत होते. परंतु, तीन तासांनंतरही ते बाहेर आले नाहीत.

Web Title: Karhad's movement of Wadi civil society in Krishna river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.