कारागृह अधीक्षकांसह कर्मचाºयांची चौकशी - कारभारात अस्ताव्यस्थपणा : अधिकाºयांनी सुनावले चोंदे यांना खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:31 AM2018-02-01T00:31:47+5:302018-02-01T00:31:59+5:30

गोडोली : सातारा जिल्हा कारागृहातील कर्मचाºयांनी केलेल्या तक्रार अर्जावर कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात चौकशी

Inquiries of employees, including prison superintendent - Asthenia in the management: Officer told Ranade to speak | कारागृह अधीक्षकांसह कर्मचाºयांची चौकशी - कारभारात अस्ताव्यस्थपणा : अधिकाºयांनी सुनावले चोंदे यांना खडे बोल

कारागृह अधीक्षकांसह कर्मचाºयांची चौकशी - कारभारात अस्ताव्यस्थपणा : अधिकाºयांनी सुनावले चोंदे यांना खडे बोल

Next

गोडोली : सातारा जिल्हा कारागृहातील कर्मचाºयांनी केलेल्या तक्रार अर्जावर कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात चौकशी अधिकारी म्हणून दाखल झालेले दत्तात्रय गावडे यांनी कारागृहातील कर्मचारी आणि अधीक्षक यांची कसून चौकशी केली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कारागृहातील एकूण पंधरा कर्मचाºयांनी कारागृह अधीक्षक नारायण चोंदे यांच्या विरोधात कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याच लेखी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अधिकारी तथा विसापूर खुले कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी जिल्हा कारागृहातील तक्रारदार पंधरा कर्मचाºयांचे बंद खोलीमध्ये जबाब घेऊन ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते कारागृह अधीक्षक नारायण चोंदे यांचीसुद्धा बंद खोलीतच कसून चौकशी केली.

हक्काची साप्ताहिक सुटी न देता तिचा देय असलेला भत्ता कारागृह अधीक्षक देत नाहीत. तसेच कारागृहात ड्युटी करत असताना तट भिंतीच्या शेजारी कर्मचाºयांना बसण्याची व्यवस्था नसल्याने शौचालयाच्या पायरीवर बसूनच पहारा द्यावा लागतो, कारागृह अधिकाºयांना असलेली दोन निवासस्थाने चोंदे हे एकटेच वापरत असल्याने वरिष्ठ तुरुंगाधिकारी अवघडे यांना कर्मचाºयांच्या कॉर्टरमध्ये राहावे लागत असून, कॉर्टस न मिळाल्याने त्यांना इतरत्र जादा भाडे देऊन राहावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार कर्मचाºयांचे जबाब झाल्यानंतर अधीक्षक चोंदे यांचीही चौकशी केल्याचे एका कर्मचाºयाने सांगितले.

...अशी झाली चौकशी
कारागृहाच्या कार्यालयातील एका खोलीमध्ये तक्रारदार कर्मचाºयांना एक-एक असे करून बोलावून बंद खोलीत त्यांचा जबाब घेण्यात आला. हा जबाब संगणकावर टाईप करून त्याची एक प्रत त्यांना देण्यात आली तर दुसरी प्रत चौकशी अहवालात जोडण्यात आली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली चौकशी सांयकाळी सहा वाजता संपली.
 

कारभारात सुधारणा हवी
सातारा कारागृहात चौकशीच्या निमित्ताने आल्यानंतर बºयाच गोष्टी दिसून आल्या. तर काही गोष्टी वरकरणी दिसत असल्या तरी तशा नसतात. एक मात्र नक्की जाणवले कारागृहाच्या कारभारात विस्कळीतपणा आहे. चौकशी पारदर्शक व्हावी, यासाठी चौकशी बंद खोलीत केली. तसेच बंगल्याच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारीबाबत पाहणी केली असता दोन मीटर दिसून आले.
- दत्तात्रय गावडे, चौकशी अधिकारी

Web Title: Inquiries of employees, including prison superintendent - Asthenia in the management: Officer told Ranade to speak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.